Karanji Recipe : करंजी तेलात सोडताच फुटतेय? मग या टिप्स फॉलो करा, दिवाळीत तुमच्याच फराळाची चर्चा होईल

Diwali Faral : करंजी तेलात तळताना ती तेलात फुटून जाते. असे होऊ नये म्हणून काय करावे याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.
Diwali Faral
Karanji Recipe Saam TV
Published On

दिवाळीसाठी आता फक्त ४ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे आता प्रत्येक व्यक्तीच्या घरी विविध फराळाचे पदार्थ बनवले जात आहेत. फराळ बनवताना यातील विविध पदार्थांत सर्वात मोठा मान असतो तो करंजीचा. फराळाच्या ताटात लक्ष्मीपूजनावेळी अन्य पदार्थ नसले तरी चालेल मात्र करंजी सर्वात महत्वाची असते. त्यामुळे प्रत्येक घराघरात करंजी बनवण्यास आता सुरुवात देखील झाली असेल.

Diwali Faral
Diwali Recipe: दिवाळीसाठी बनवा पौष्टिक अन् चविष्ट कडबोळी; रेसिपी पाहा

आता तुम्ही देखील घरी करंजी बनवत असाल. करंजी बनवणे फार सोपं वाटतं. मात्र करंजी तेलात तळणे अनेकांना कठीण जाते. अनेकदा करंजी तेलात तळताना ती तेलात फुटून जाते. असे होऊ नये म्हणून काय करावे याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.

करंजी बनवताना या चूका टाळा

करंजी बनवताना त्याच्या कडा छान एकमेकांना चिकटाव्यात यासाठी पीठ म्हणजेच कणीक चांगली मळणे महत्वाचे आहे. अनेक व्यक्ती कणीक चुकीच्या पद्धतीने मळतात.

कणीक मळताना त्यात तुपाचे मोहन घ्या. तूप नसल्यास तुम्ही तेलाचे मोहन सुद्धा यासाठी वापरू शकता. याने कणीक अगदी मऊ भिजली जाते.

कणीक चिकट असावी यासाठी काही महिला त्यात जास्तीचे पाणी मिक्स करतात. मात्र जास्त पाणी टाकल्याने कणीक आणखी जास्त कडक होते. तसेच ते पीठ तेलात गेल्यानंतर फुलत नाही.

करंजी बनवताना त्यात सारण भरावे लागते. शक्यतो सर्व व्यक्ती यामध्ये नारळाचेच सारण भरतात. त्यामुळे सारण भरून झालं की त्याच्या कडा निट दाबून घ्या.

सारणामध्ये रवा देखील असतो. रवा तेव्हा आपण जिथे कडा दाबणार आहोत तेथे येतो तेव्हा त्या बंद होत नाहीत. कडा उघड्याच राहतात आणि तेलात गेल्यावर पूर्ण करंजी खुली होते.

करंजी बनवताना कणीक काही व्यक्ती दुधात मळतात मात्र तसे करू नका. त्याने कणीक आणखी कडक होते.

फक्त कडा बंद करताना दुधाचा हात घ्यावा. त्यामुळे करंजी तेलात उघडी होत नाही.

करंजी तळताना तिला जास्त उष्णतेची गरज नसते. त्यामुळे करंजी तळत असताना गॅस मंद आंचेवरच ठेवा. गॅस जास्त फास्ट ठेवू नका.

Diwali Faral
Diwali Special 2023: दिवाळीच्या चकलीसाठी बनवा परफेक्ट भाजणी; पाहा रेसिपी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com