Diwali Special 2023: दिवाळीच्या चकलीसाठी बनवा परफेक्ट भाजणी; पाहा रेसिपी

Diwali Chakli Recipe : कुरकुरीत चकली बनवण्यासाठी परफेक्ट भाजणी महत्त्वाची आहे.
Diwali Chakli Recipe
Diwali Chakli RecipeSaam Tv
Published On

Chakili Bhajani Recipe:

दिवाळीच्या मुहूर्तावर घराघरात फराळ केला जातो. फराळासाठी अनेक चविष्ट पदार्थ केले जातात. यातील एक चटकदार आणि खमंग पदार्थ म्हणजे चकली. चकली सर्वांनाच आवडते. कुरकुरीत चकली बनवण्यासाठी परफेक्ट भाजणी महत्त्वाची आहे.

चकली बनवल्यानंतर काही दिवसात नरम पडतात. त्यासाठी चकलीची भाजणी व्यवस्थित बनायला हवी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला भाजणीचे योग्य प्रमाण वापरुन चकली कशी बनवायची ते सांगणार आहोत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजणीचे साहित्य

  • 3 वाट्या तांदूळ

  • दीड वाटी चन्याची डाळ

  • १ वाटी उडीद डाळ

  • अर्धी वाटी मूग डाळ

  • १ वाटी पोहे

  • पाऊण वाटी धणे

  • २ टेबलस्पून जिरे

Diwali Chakli Recipe
Diwali 2023 : दिव्यांची आरास, रोशनाईचा सण... दिवाळी का साजरी केली जाते? जाणून घ्या रंजक कथा

भाजणीची रेसिपी

  • सर्वप्रथण तांदूळ, डाळ, उडीदाची डाळ, मूग डाळ धुवून सावलीत वाळवून घ्यावीत.

  • क्यानंतर तांदूळ लालसर होईपर्यंत भाजून घ्या.

  • त्यानंतर चन्याची डाळ आणि उडीद डाळ लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यावी.

  • यानंतर मूग आणि पोहे भाजून घ्यावेत. पोहे भाजत असताना त्यात धणे टाकावे, सर्व एकत्रितपणे भाजून घ्यावे.

  • हे सर्व मिश्रण एकत्रित थंड करावे. त्यानंतर त्यात २ टीपस्पून जिरे घालून भाजणी बारीक दळून घ्यावी.

Diwali Chakli Recipe
Driving License Link To Aadhar Card : ड्रायव्हिंग लायसन्स आधारकार्डशी कसे लिंक कराल? ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रोसेस जाणून घ्या

चकलीची रेसिपी

  • सुरुवातीला एका पातेल्यात पाऊण वाटी गरम पाणी, तिखट , मीठ, ओवा, तीळ, हिंग आणि २ टीपस्पून तूप टाकावे. त्यानंतर पाण्याला उकळी आली की त्यात २ वाट्या भाजणी टाकावी.

  • भाजणीचे पीठ चांगले मिक्स करुन घ्यावे. त्यानंतर १ तासभर पीठ झाकून ठेवावे. तासाभराने पीठ साध्या पाण्यास भिजवून घ्या.

  • चकलीच्या यंत्राला आतून तेल लावून घ्या. त्यात तयार केलेले पीठ टाकावे. त्यानंतर प्लॅस्टिकवर छान आकाराच्या चकल्या करुन घ्या.

  • त्यानंतर कठईच तेल तापल्यावर मध्यम आचेवर चकली तळून घ्यावी.

Diwali Chakli Recipe
Hair Care Tips : कुरळ्या केसांना सरळ करण्याचा विचार करताय? या टीप्स लक्षात ठेवा, अन्यथा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com