Diwali 2023 : दिव्यांची आरास, रोशनाईचा सण... दिवाळी का साजरी केली जाते? जाणून घ्या रंजक कथा

Reason Why Indian Celebrates Deepavali 2023 : दिवाळी हा सण का साजरा केला जातो? जाणून घेऊया या सणाचे महत्त्व आणि रंजक कथा
Diwali 2023
Diwali 2023Saam Tv
Published On

Why Celebrate Diwali 2023 :

दिवाळी म्हटंल की, दिव्यांची आरास, रोशनाई, फाटके, रांगोळी आणि चमचमीत फराळ खायला मिळते. दिवाळी पहाटला अभ्यंगस्नान, उटणे आणि धमाल मस्ती.

दिवाळी या सणाला धार्मिकदृष्ट्या अधिक महत्त्व आहे. हिंदू या धर्मात दिवाळी हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. देवी लक्ष्मी, श्रीगणेश आणि कुबेराची पूजा केली जाते. यावर्षी लक्ष्मी पूजन हे १२ नोव्हेंबर २०२३ पासून देश-विदेशात साजरे केले जाईल. अंधारावर प्रकाशाने विजय मिळवणारा दिवाळी हा सण साजरा केला जातो. दिवाळी हा सण का साजरा केला जातो? जाणून घेऊया या सणाचे महत्त्व आणि रंजक कथा ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. १४ वर्षांच्या वनवासानंतर श्रीराम अयोध्येत

रावणाचे (Ravan) दहन करुन श्रीराम पत्नी सीता आणि लक्ष्मणासोबत अयोध्येत परतले, तेव्हा संपूर्ण अयोध्यानगरी दिव्यांनी उजळून निघाली होती असे रामायणात सांगितले जाते. १४ वर्षांच्या वनवासानंतर श्रीराम अयोध्येत परतल्यानंतर दिवाळी साजरी करण्यात आली. तेव्हापासून दिवाळी हा सण अंधारावर प्रकाशाने विजय मिळवलेला सण (Festival) दरवर्षी साजरा केला जाऊ लागला.

Diwali 2023
Rama Ekadashi 2023: रमा एकादशीला करु नका या चुका, जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत

2. नरकासुराचा वध

भगवान श्रीकृष्णाने पत्नी सत्यभामा हिच्या मदतीने नरकासुराचा वध केला होता. नरका सूरला एका स्त्रीने मारण्याचा शाप दिला होता. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला नरकासुराचा वध करण्यात आला. त्याचा दहशतीतून आणि अत्याचारापासून सुटका मिळाली म्हणून तेव्हा आनंदात लोकांनी दीपोत्सव साजरा केला जातो. तसेच दुसऱ्या दिवाळी (Diwali) साजरी करण्यात आली.

3. देवी लक्ष्मीचा अवतार

समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मीजींनी ब्रह्मांडात अवतार घेतला होता. देवी लक्ष्मी ही संपत्ती आणि समृद्धीची देवी मानली जाते. त्यामुळे प्रत्येक घरात दिवा लावण्यासोबतच आपण लक्ष्मीची पूजा करतो. दिवाळी साजरा करण्याचे हेही एक प्रमुख कारण आहे

Diwali 2023
Diwali Date 2023 : वसुबारस, धनत्रयोदशी आणि लक्ष्मी पूजन कधी? जाणून घ्या योग्य तिथी

4. मुघल सम्राट जहांगीर

मुघल सम्राट जहांगीरने शिखांचे 6वे गुरु गोविंद सिंग यांच्यासह 52 राजांना ग्वाल्हेर किल्ल्यात कैद केले होते. गुरूंची तुरुंगातून सुटका होऊ लागल्यावर त्यांनी आपल्यासोबत कैदेत असलेल्या राजांच्या सुटकेचीही मागणी केली. गुरू हरगोविंद सिंग यांच्या विनंतीवरून राजांचीही कैदेतून सुटका झाली. त्यामुळे शीख समाजाचे लोकही हा सण साजरा करतात.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com