दसऱ्याच्या दिवशी रावणदहन करण्याची परंपरा अविरतपणे सुरू आहे. राजा रावण हे आदिवासी समाजाचं दैवत आहे. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी रावणदहन केले तर भंडारा जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. दरम्यान आदिवासी समाजाने आक्रोश मोर्चा काढला व त्या मोर्च्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर करवाई केली जाणार असल्याचे पत्रच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यांत रावणदहन झाले तर आदिवासी समाज आक्रमक होण्याची शक्यता आहे.
आदिवासी समाजाचा रावणदहनाला का आहे विरोध?
आदिवासी समाजाकडून रावणाला दैवत मानलं जातं. शिवाय रावणामध्ये अनेक चांगले गुण होते. तो राजनीतीतज्ज्ञ, उत्कृष्ट शिल्पकार, आयुर्वेदाचार्य, संगीततज्ज्ञ होता. एका राजामध्ये जे गुण आवश्यक असतात ते सर्व रावणामध्ये होते. तरीही त्याला नेहमी खलनायक म्हणून प्रस्तुत केले जाते. त्याच्यासारखा पराक्रमी राजा नव्हता. त्यामुळे त्याच्या प्रतिमेचे दहन करून त्याला अपमानित करणे चिकीचे आहे, असे आदिवासी समाजाचे म्हणणे आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
रावण दहनामागे हिंदू धर्माची मान्यता?
सध्या शारदीय नवरात्रोत्सव सुरू आहे. या नवरात्रोत्सवात देवी दुर्गेची विविध रूपात पूजा केली जाते. त्यांनंतर दशमी म्हणजेच दशहरा येतो. यादिवशी देशभरात रावण दहनाची परंपरा आहे. यामागे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा आहेत. हिंदू धर्मानुसार दसरा हा असत्यावर सत्याचा विजय आहे. रावण हा महान राजा होता मात्र, त्याने कपटाने माता सीतेचे अपहरण करून लंकेत नेले. त्याला दंड देण्यासाठी भगवान रामाने त्याच्याशी युद्ध केले आणि त्याचा वध केला. त्यामुळे या दिवसाला विजयादशमी असेही म्हणतात आणि या दिवशी रावणदहनाची मोठी परंपरा भारतात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.