Nankhatai Recipe : बेकरीत मिळते तशीच नानकटाई घरच्याघरी कशी बनवाल? वाचा रेसिपी

Nankhatai Recipe at Home : घरच्याघरी नानकटाई कशी बनवतात याची रेसिपी आज आम्ही तुमच्यासाठी आणखी आहे.
Nankhatai Recipe at Home
Nankhatai Recipe Saam TV
Published On

दिवाळीत प्रत्येकाच्या घरी विविध फराळाचं साहित्य बनवण्यात येतं. त्यात नानकटाई अनेकांची फेवरेट असते. नानकटाई बनवणे फार कठीण आहे असं अनेक व्यक्तींना वाटतं. मात्र नानकटाई सर्वात सोपी आहे. याची रेसिपी देखील अगदी सिंपल आहे. त्यामुळे आज नानकटाई नेमकी कशी बनवायची याची परफेक्ट रेसिपी जाणून घेणार आहोत.

Nankhatai Recipe at Home
Mishti Doi Recipe : मिष्टी दोई बनवण्याची सिंपल आणि सोपी रेसिपी

नानकटाई बनवताना तुमच्याकडे योग्य प्रमाणात साहित्य असणे महत्वाचे आहे. योग्य प्रमाणात साहित्य असस्यास ही रेसिपी अजिबात चुकत नाही. अनेक महिला नानकटाई बनवतात आणि ती काही वेळाने विरघळते किंवा बेक होतच नाही अशा गोष्टी घडतात. हे सर्व नानकटाईचे पीठ योग्य प्रमाणात न भिजवल्यामुळे होत असते.

साहित्य

साजूक तूप - अर्धा कप

पिठी साखर - पाव वाटी

मैदा - १ कप

बेसन पीठ - पाव कप

मीठ - चविनुसार

बेकींग पावडर - १ चमचा

वेलची पूड - १ चमचा

कृती

सर्वात आधी एका वाटीत तूप घ्या. त्यानंतर यामध्ये पिठी साखर मिक्स करा. पिठी साखर मिक्स केल्यावर हे मिश्रण एकत्र छान फेटून घ्या. तुम्हाला किमान १० ते १५ मिनिटे तरी मिश्रण फेटून घ्यायचे आहे. यासाठी तुम्ही हाताचा किंवा पदार्थ फेटणाऱ्या मशिनचा वापर सुद्धा करू शकता. पुढे या पिठामध्ये मैदा मिक्स करा.

तूप, साखर आणि त्यात मैदा मिक्स केल्याने पिठ झोडं घट्ट होतं. हे पीठ आणखी जास्त घट्ट व्हावं म्हणून या बेसन पीठ सुद्धा मिक्स करा. बेसन पिठ मिक्स केल्यावर यात मीठ, बेकिंग पावडर, वेलची पावडर मिक्स करून घ्या. त्यानंतर हे पीठ छान एकजीव करून मळून घ्या. अशा पद्धतीने पीठ मळून घेतल्यावर त्याते बारीक बारीक गोळे तयार करा.

बारीक गोळ्यांना आकार देत हातावरच नानकटाई शेप द्या. अशा पद्धतीने तयार झालेली नानकटाई तुम्ही बेकरी किंवा घरच्याघरी ओव्हनमध्ये भाजू शकता. तसेच यात तुम्ही ड्रायफ्रूट्स सुद्धा मिक्स करू शकता. अशा पद्धतीने तयार झाली सुंदर आणि टेस्टी नानकटाई. ही नानकटाई तुम्ही चहाबरोबर सुद्धा खाऊ शकता.

Nankhatai Recipe at Home
Sev Boondi Recipe : घरच्याघरी झटपट बनवा शेव बुंदी; वाचा १० मिनिटांत तयार होणारी रेसिपी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com