Ruchika Jadhav
मिष्टी दोई बनवताना सर्वात आधी मातीच्या भांड्यावर दही लावून घ्या. दही अगदी थोड्या प्रमाणात यावर पसरवून घ्या.
त्यानंतर एका पॅनमध्ये साखर घ्या. तुम्ही एक लिटर दुध धेत असाल तर १ वाटी साखर लागेल.
साखर वितळवून घ्या. साखर वितळली की त्याचा कडक पाक होईपर्यंत गरम करू नका.
तयार पाकामध्ये पाणी ओतून घ्या. पाणी ओतून पाकाला आणखी एक उकळी येऊ द्या.
तयार पाकामध्ये तम्हाला हवं असेल तर तुम्ही वेलची पूड सुद्धा मिक्स करू शकता.
तयार मिश्रण नंतर दुधात मिक्स करा. दुधात हे मिक्स केल्यावर छान सेट होऊ द्या.