Nag Panchami 2023 Horoscope : नागपंचमी हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो, या दिवशी नाग देवतेची पूजा करण्याचा विधी आहे. यंदा २१ ऑगस्टला नागपंचमी साजरी होणार असून, हा दिवस श्रावणी सोमवार असल्याने त्याचे महत्त्व आणखी वाढणार आहे.
नागपंचमीच्या दिवशी भगवान भोलेनाथ आणि नाग देवता यांचे आशीर्वाद एकत्र मिळतील. यासोबतच नागपंचमीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग देखील एक शुभ योगायोग बनत आहे, जो काही राशींसाठी खूप भाग्यवान असणार आहे. चला जाणून घेऊया नागपंचमीचा दिवस कोणत्या राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे.
1. वृश्चिक
या नागपंचमीचा दिवस खूप खास असणार आहे, या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने नोकरीत प्रगती होईल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांनाही भोलेनाथांच्या कृपेने चांगली नोकरी मिळू शकते.
2. धनु
नागपंचमीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. यामुळे हा दिवस खूप शुभ असेल. या दिवशी शंकराची किंवा नागाची पूजा केल्याने नोकरी व व्यवसायात प्रगती होईल. नवीन नोकरी सुरू करण्याची ही एक उत्तम संधी आहे.
3. मकर
या लोकांनी नागपंचमीच्या (Nag Panchami) दिवशी शंकराची आणि नागदेवतेची एकत्र पूजा करावी असे केल्याने अनेक दिवसांपासून चालत आलेल्या समस्या दूर होतील. उत्पन्नाची नवीन साधने निर्माण होतील. कुटुंबात सुख-शांती राहील.
4. कुंभ
नागपंचमीच्या दिवशी कुंभ राशीच्या लोकांनी नाग देवतेला दूध (Milk) अर्पण करावे, असे केल्याने सर्व समस्या दूर होतील. जे काम तुम्ही खूप दिवसांपासून करण्याचा प्रयत्न करत होता ते पूर्ण होईल. विवाह-विवादाचे नियोजन करणाऱ्यांना कुटुंबाची (Family) मान्यता मिळू शकते.
टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.