Nag Panchami 2023 : नागपंचमीला उपवास का केला जातो? या दिवसाची सुरुवात कधी झाली? जाणून घ्या

Nag Panchami History 2023 : श्रावण महिन्यातल्या पंचमीलाच नागपंचमी का साजरी केली जाते? या दिवशी उपवास का केला जातो?
Nag Panchami 2023
Nag Panchami 2023 Saam tv
Published On

Nag Panchami Upwas:

श्रावण महिना सुरु झाला की, अनेक सण व उत्सव सुरु होतात. श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत-वैकल्ये व उपासना केली जाते.

श्रावण महिन्यातील पहिला सण हा नागपंचमी. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच 21 ऑगस्ट 2023 रोजी सोमवारी साजरी केली जाणार आहे. हा दिवस नागांच्या पूजेसाठी विशेष मानला जातो. पंचमी तिथी ही सापांना अतिशय प्रिय मानली जाते. परंतु, पंचमीलाच नागपंचमी का साजरी केली जाते? या दिवशी उपवास का केला जातो? जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

Nag Panchami 2023
Nag Panchami 2023 Date: नागपंचमी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त व पूजा पद्धत

पौराणिक कथेत असे सांगितले आहे की, पृथ्वीच्या आत नाग लोकात शक्तिशाली साप राहातात. सांपाबद्दल एक नाही तर अनेक समजूती आहेत. नागपंचमीच्या पूजेची सुरुवात कशी झाली व ही तिथी सापांना अधिक प्रिय का हे जाणून घेऊया.

1. सापांची उत्पत्ती कशी झाली?

भविष्य (Bhavishya) पुराणानुसार, महर्षी कश्यप यांना अनेक पत्नी होत्या, त्यापैकी एकाचे नाव कद्रू आणि दुसरीचे नाव विनिता. एकदा महर्षि कश्यप यांनी कद्रूच्या पत्नीवर (Wife) प्रसन्न होऊन तिला नागांची आई होण्याचे वरदान दिले. अशा प्रकारे सापांची उत्पत्ती झाली. त्याचवेळी ऋषी कश्यपची दुसरी पत्नी विनिता. पक्षीराज गरुडाची माता झाला. कद्रू आणि विनिता यांच्यात नेहमी ईर्षा असायची.

Nag Panchami 2023
Nag Panchami 2023 : कुंडलीत आहे कालसर्पदोष? नागपंचमीच्या दिवशी या चुका करणे टाळा, अन्यथा होऊ शकतात वाईट परिणाम

2. पंचमी तिथी सापांना का प्रिय आहे?

शाप मिळाल्यावर नागपुत्र दु:खी झाला आणि वासुकी या नागाचे नेतृत्व करून तो ब्रह्माजींकडे पोहोचला. ब्रह्माजी म्हणाले काळजी करू नका. तुला जरतकरू ही बहीण असेल, तिचा विवाह जरतकरू नावाच्या ऋषीशी होईल. या दोघांपासून अस्तिक नावाचा पुत्र होईल. तो हा यज्ञ थांबवून सापांचे रक्षण करेल. ते ऐकून नागाला (snake) खूप आनंद झाला. वेळ आल्यावर राजा परीक्षिताचा नागाने मृत्यू झाल्यानंतर सर्पवंशाचा नाश करण्यासाठी राजा जनमेजयाने सर्प मेध यज्ञाचे आयोजन केले.

या यज्ञात लाखो कोटी सर्प जळून राख झाले असता अस्तिक मुनी तेथे पोहोचले आणि त्यांनी सर्प यज्ञ थांबवून नागांवर थंड दूध ओतले. त्यामुळे सापांच्या अंगाला गारवा तर मिळालाच, सोबतच भाताचा लावाही ठेवला. त्यामुळे सापांचे प्राण वाचले. सापांचे अस्तित्व पृथ्वीवर राहिले. ज्या दिवशी ब्रह्माजींनी सापांना जगण्याचे वरदान दिले.ज्या दिवशी ब्रह्माजींनी सापांना जगण्याचे वरदान दिले. त्या दिवशी पंचमी तिथी होती. ज्या दिवशी अस्तिक मुनींनी यज्ञ केला.

Nag Panchami 2023
Good Habits In Children : मुलांना लहानपणापासूनच या ९ चांगल्या सवयी लावा, लोक म्हणतील वाह!

3. नागपंचमीचा उपवास का केला जातो?

असे म्हटले जाते की, सत्येश्वरी देवीमुळे नागपंचमीचा उपवास केला जातो. सत्येश्वरीला भाऊ होता. त्याचे नाव सत्येश्वर असे होते. नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्येश्वरीचा अकस्मिात मृत्यू झाला. भावाच्या विरहामुळे सत्येश्वरी दु:खी होती. अन्नत्याग केल्यानंतर सत्येश्वर नागरुपात दिसला. त्यानंतर तिने नागाला आपले भाऊ मानले. सत्येश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाली आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या भावाचे मी रक्षण करेल, असे नागदेवतेने वचन तिला दिले. तेव्हापासून नागपंचमीला स्त्रिया नागाचे पूजन करू लागल्या.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com