Konkan Travel SAAM TV
लाईफस्टाईल

Konkan Travel : कोकणात पावसाळ्यात आवर्जून करा 'या' मंदिरांची सफर, अध्यात्मासोबत अद्भूत निसर्गाचा अनुभव

Religious Places : कोकणात निसर्ग सौंदर्य अनुभवताना अध्यात्माची ही जोड ठेवा आणि पावसाळ्यात कोकणातील 'या' पसिद्ध आणि प्राचीन मंदिरांना भेट द्या. मनाला भरपूर शांती मिळेल.

Shreya Maskar

कोकणात फिरण्यासाठी पत्येक जण आतूर असतो. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून आवर्जून तो कोकणची सफर करतो. पावसात कोकणाचे सौंदर्य आभाळाला गवसणी घालते. आपण अनेक वेळा कोकणातील समुद्रकिनारे, धबधबा यांना भेट देतो. पण कोकणात आध्यात्मिक वातावरणही मनाला प्रसन्न करणारे आहे. कोकणात अशी अनेक मंदिरे आहेत ज्यांचे पावसाळ्यात सौंदर्य खुलून येते. निसर्गाच्या सानिध्यात 'या' मंदिरांमध्ये तुम्हाला स्वर्गसुख अनुभवायला मिळेल.

मार्लेश्वर देवस्थान

मार्लेश्वर मंदिर रत्नागिरी मारळ येथे आहे. हे शंकराचे प्रसिद्ध मंदिर आहे. रत्नागिरी पासून हे सर्वात जवळ आहे. मार्लेश्वर मंदिर डोंगरावर वसलेले आहे. त्यामुळे पावसात याचे सौंदर्य आणखी वाढते. आकाशात धुक्यामध्ये हे सौंदर्य अजून खुलते. या मंदिराच्या सभोवताली अनेक धबधबे पाहायला मिळतील. तसेच मार्लेश्वर मंदिरात पोहचण्यासाठी तुम्हाला डोंगर चढावा लागतो. या मंदिराच्या बाजूनेच एक नदी वाहत असते. मार्लेश्वर मंदिरातून तुम्हाला फेसाळलेला धबधबा पाहायला मिळतो. याचा प्रवाह मात्र कमी असतो. अशा निसर्गरम्य परिसरातील तुम्ही मंदिरापर्यंत पोहचू शकता.

पोखरबाव गणपती मंदिर

पोखरबाव गणपती मंदिर हे देवगडमध्ये आहे. देवगड बीचपासून पोखरबाव गणपती मंदिर खूप जवळ आहे. हे गणपतीचे मंदिर आहे. तसेच येथे स्वयंभू शिवलिंग पाहायला मिळते. येथे तुम्हाला पांडवकालीन विहीर पाहता येईल. पावसाळ्यात ही विहीर तुडुंब भरते. हे दृश्य मनाला मोहून टाकते. येथील शिवलिंग श्री ओंकारेश्वर शिव पिंड म्हणून ओळखले जाते.

हिरण्यकेशी मंदिर

आंबोली घाटात सावंतवाडी पासून हिरण्यकेशी मंदिर जवळ आहे. हे मंदिर माता पार्वतीचे आहे. या मंदिरातून हिरण्यकेशी नावाची नदी उगम पावते. ही नदी मंदिराच्या गाभाऱ्यातून उगम पावत असल्यामुळे समोरील तळ्यात तुम्हाला स्वच्छ पाणी बघायला मिळते. असे म्हटलं जातं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT