Solapur Travel SAAM TV
लाईफस्टाईल

Solapur Places To Visit: कुडल संगम ते अक्कलकोट मंदिर; सोलापूरमधील 'या' ठिकाणांना आवर्जून भेट द्या..

Best Places To Visit in Solapur: महाराष्ट्रातील सोलापूर हे पर्यटनाचे आकर्षण आहे. सोलापूरमधील 'या' निसर्गरम्य ठिकाणांना नक्की भेट द्या.

Shreya Maskar

महाराष्ट्र हा निसर्गाने वेढलेला आहे. सोलापूरला ऐतिहासिक, सांस्कृतिक, औद्योगिक वारसा लाभला आहे. सोलापूर शहर वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध आहे. येथील मंदिरांची बांधणी सोलापूरचे सौंदर्य दर्शवते. महाराष्ट्रामधील सोलापूर हे फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. सुट्टीमध्ये आवर्जून सोलापूरमधील या ठिकाणांना भेट द्या.

शस्त्रागार संग्रहालय न्यू पॅलेस अक्कलकोट

सोलापूरमधील अक्कलकोट येथील राजवाडा हे शस्त्रगार संग्रहालय आहे. येथे अक्कलकोट संस्थानचे राजे फत्तेसिंह यांचा खाजगी संग्रह आहे. या संग्रहालयात अनेक दुर्मिळ वस्तू आहेत. यात राज्यांचे धनुष्यबाण, तलवारी, भाले ठेवण्यात आले आहेत.

कुडल संगम

सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर येथे भीमा आणि सीना या नदींच्या संगमावर वसलेले हे ठिकाण आहे. येथे बहुमुखी शिवलिंग, वास्तुकला आणि शिल्पकला आहे. येथे निसर्गरम्य वातावरण असते.

सोलापूर भुईकोट किल्ला

भुईकोट किल्ला हे सोलापूरातील प्रमुख आकर्षण आहे. हा किल्ला चौदाव्या शतकात बांधला आहे. या किल्ल्यात दुहेरी तटबंदी आहे. येथे स्थापत्य शैली प्रतिबिबिंत केली आहे. येथे अनेक वर्ष औरंगजेबाचे निवासस्थान होते.

अक्कलकोट मंदिर

संत श्री स्वामी समर्थ यांचा मठ अक्कलकोट येथे आहे. येथे रोज हजारो भाविकांची गर्दी असते. सोलापूरपासून ४० किमी अंतरावर हे ठिकाण आहे. या ठिकाणी भाविकांना रोज मोफत जेवण दिले जाते. येथे आल्यावर स्वामींच्या चरणी आल्यासारखे वाटते. स्वामींचे भक्त नेहमीच अक्कलकोटला भेट देतात. अक्कलकोटच्या मंदिरात मन अगदी प्रसन्न होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

SCROLL FOR NEXT