Ravivar che Upay saam tv
लाईफस्टाईल

Ravivar che Upay: रविवारच्या दिवशी जरूर करावेत 'हे' उपाय; सूर्य देव प्रसन्न होऊन देतील आशिर्वाद

Remedies to please Sun God: हिंदू धर्मानुसार, प्रत्येक दिवसाचे स्वतःचे असे एक विशेष महत्त्व आहे. रविवारचा दिवस हा प्रत्यक्ष दिसणाऱ्या आणि ऊर्जा प्रदान करणाऱ्या सूर्यदेवाला समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा मानला जातो.

Surabhi Jayashree Jagdish

  • रविवार हा सूर्यदेवाला समर्पित दिवस मानला जातो.

  • उगवत्या सूर्याला अर्घ्य देणे अत्यंत शुभ मानले जाते.

  • लाल चंदनाचा तिलक आत्मविश्वास वाढविण्यास मदत करतो.

हिंदू धर्मात प्रत्येक दिवस एखाद्या ना एखाद्या देवाला समर्पित मानला जातो. त्याप्रमाणे रविवारचा दिवस सूर्यदेवाला अर्पण केला जातो. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने शुभ फळ मिळतं. त्यामुळे रविवारी उगवत्या सूर्याला जल अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं.

असं मानलं जातं की, जर एखाद्याच्या कुंडलीत सूर्याची स्थिती कमजोर असेल, तर त्या व्यक्तीचे प्रयत्न व्यर्थ ठरतात आणि यशाचं फळ मिळत नाही. सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी रविवारी काही खास उपाय करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. हे उपाय केल्यास सूर्य ग्रहाची कुंडलीतील स्थिती बळकट होते आणि जीवनातील अडचणी दूर होतात.

उगवत्या सूर्याला अर्घ्य द्या

रविवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पूर्वदिशेला तोंड करून उगवत्या सूर्याला तांब्याच्या लोट्यातून स्वच्छ पाणी अर्पण करा. यावेळी 'ॐ सूर्याय नमः', 'ॐ वासुदेवाय नमः' आणि 'ॐ आदित्याय नमः' हे मंत्र उच्चारल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात.

लाल चंदनाचा तिलक लावा

रविवारी घरातून बाहेर पडताना कपाळावर लाल चंदनाचा तिलक लावावा. हा तिलक यश, आत्मविश्वास आणि उर्जेचं प्रतीक मानला जातो. याशिवाय, या दिवशी लाल रंगाचे कपडे घालणं शुभ मानलं जातं. लाल रंग सूर्याशी संबंधित असून यामुळे महत्त्वाचे काम यशस्वीरीत्या पार पडतात, असं मानलं जातं.

दरवाज्यावर दिवा लावा

रविवारी संध्याकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याजवळ तुपाचा दिवा लावा. असं केल्याने सूर्यदेव आणि लक्ष्मीमाता दोघंही प्रसन्न होतात आणि धनसंबंधी अडचणी कमी होतात.

वडाच्या पानाचा उपाय

जर तुमचं एखादं मनापासून काही पूर्ण व्हावं असं वाटत असेल, तर ते आपल्या हाताने वडाच्या पानावर लिहा आणि ते पान जवळच्या नदीत किंवा वाहत्या पाण्यात सोडून द्या. हा उपाय तुमची मनोकामना पूर्ण होण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो.

दान केल्याने मिळतो लाभ

रविवारी सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी गूळ, दूध, तांदूळ आणि लाल कपड्यांचे दान करणं शुभ मानलं जातं. या गोष्टी दान केल्याने सूर्याची कृपा मिळते आणि आयुष्यात सुख, समाधान व चांगलं आरोग्य प्राप्त होतं.

रविवारचा दिवस कोणाला समर्पित आहे आणि का?

रविवारचा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. सूर्यदेवाची पूजा केल्याने आरोग्य, यश आणि सौम्य फळे मिळतात, असे मानले जाते.

उगवत्या सूर्याला अर्घ्य देताना कोणते मंत्र म्हणावेत?

'ॐ सूर्याय नमः', 'ॐ वासुदेवाय नमः' आणि 'ॐ आदित्याय नमः' हे मंत्र उच्चारल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात.

रविवारी लाल चंदनाचा तिलक का लावावा?

लाल चंदनाचा तिलक सूर्याशी संबंधित आहे. तो यश, आत्मविश्वास आणि ऊर्जा वाढविण्याचे प्रतीक मानला जातो.

घराच्या दरवाज्याजवळ दिवा लावण्याचा काय फायदा?

रविवारी घराच्या मुख्य दरवाज्याजवळ तुपाचा दिवा लावल्याने सूर्यदेव आणि लक्ष्मीमाता दोघेही प्रसन्न होतात आणि धनसंबंधी अडचणी कमी होतात.

मनोकामना पूर्ण होण्यासाठी कोणता उपाय सांगितला आहे?

मनापासून एक मनोकामना वडाच्या पानावर लिहून ते वाहत्या पाण्यात सोडल्यास ती पूर्ण होण्याची शक्यता असते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gorakhpur Student Case : विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या गोतस्कराचा पोलिसांकडून एन्काऊंटर; दोन्ही पायांवर झाडल्या गोळ्या

Indira Ekadashi 2025: आज आहे इंदिरा एकादशी, रात्री करा हे 3 सोपे उपाय, पैशांची तंगी होईल कायमची दूर

Shocking : हातात लोखंडी दांडके, अंगावर रेनकोट, मध्यरात्री वावर; अंबरनाथकरांमध्ये 2 तरुणांची दहशत

Honda Amaze Car : 'बोल्ड अँण्ड ब्लॅक ब्युटी'; स्मार्ट फीचर्स पण किंमत मात्र स्वस्त

Congress : काँग्रेस पक्षाला मोठा धक्का! नरेंद्र मोदींच्या आईचा Ai व्हिडीओ बनवल्याने कोर्टाने दिला दणका

SCROLL FOR NEXT