Important Update on MPSC Prelims 2024 Saam TV
लाईफस्टाईल

MPSC Prelims Exam 2024 Date: विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; एमपीएससीच्या पूर्व परीक्षेची तारीख बदलली, वाचा सविस्तर

MPSC Prelims Exam 2024 Date Got Changed: एमपीएससीच्या परीक्षार्थींसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. एमपीएसची पूर्व परीक्षा ६ जुलै होणारी परीक्षा आता २१ जुलै रोजी होणार आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास वेळ मिळणार आहे.

Vishal Gangurde

मुंबई : एमपीएससीच्या परीक्षार्थींसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. एमपीएसची पूर्व परीक्षा ६ जुलै रोजी होणारी परीक्षा आता २१ जुलै रोजी होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमपीएससी परीक्षेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. एमपीएससीने पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली आहे. एमपीएससीकडून ६ जुलै रोजी पूर्व परीक्षा जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर या तारखेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे ही परीक्षा आता २१ जुलै रोजी होणार आहे.

आर्थिक मागासवर्गीयांना ओबीसी वर्गातून अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. ईडब्लूएस विद्यार्थ्यांना ओबीसी वर्गातून अर्ज करण्यासाठी मुदतवाढीसाठी मिळावी, अशी विनंती करण्यात आली होती.

एमपीएसीने ही विनंती मान्य केली. त्यानंतर ही पूर्व परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवरही प्रसिद्ध करण्यात आली आहे.

एमपीएससीची परीक्षा वर्णनात्मक स्वरुपात होणार

एमपीएससीची परीक्षा वर्णनात्मक स्वरुपात होण्याविषयी शिक्कामोर्तब झालं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करण्यात येत होती. त्यानंतर याबाबत आयोगाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता २०२५ पासून ही एमपीएससीची परीक्षा वर्णनात्मक स्वरुपात होईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

या परीक्षेसाठी नवा अभ्यासक्रम २०२३ पासून लागू होणार होता. मात्र, विद्यार्थ्यांनी विरोध केला. विद्यार्थ्यांनी पत्र लिहून निर्णय बदलण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांची मागणी मान्य केली. त्यानंतर आता वर्णनात्मक परीक्षा २०२५ पासून सुरु होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

SCROLL FOR NEXT