महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी 2024 ची परीक्षा शनिवार, दिनांक 6 जुलै, 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. सुधारित मागणीपत्रानुसार या परीक्षेमधून विविध संवर्गातील एकूण 524 पदांचा सुधारित तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे, अशी माहिती आयोगाने दिली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी २९ डिसेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. २७४ पदांसाठी २८ एप्रिल २०२४ रोजी परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला आणि स्वतंत्र १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली होती.
सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण निश्चिती करण्यात आलं आहे. त्यानुसार सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनात कळविण्यात आलेलं आहे. आयोगाच्या २१ मार्च २०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार आता शनिवार, दि. ६ जुलै २०२४ रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.
09 मे, 2024 रोजी 14.00 ते दिनांक 24 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत
ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याची मुदत
दिनांक 24 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत
भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याची मुदत
26 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत आहे.
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत
27 मे, 2024 रोजी आहे.
(1) उप जिल्हाधिकारी, गट-अ (एकूण 07 पदे),(2) सहाय्यक राज्य कर आयुक्त, गट-अ (एकूण 116 पदे),(3) गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी),गट-अ (एकूण 52 पदे),(4) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ (एकूण 43 पदे),(5) सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी (एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प)(श्रेणी दोन), गट-अ (एकूण 03 पदे),(6) उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ (एकूण 07 पदे),(6) उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ (एकूण 07 पदे),(7) सहायक कामगार आयुक्त, गट – अ (एकूण 02 पदे),(8) सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, गट – अ (एकूण 01 पद),(9) मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी, गट-ब (एकूण 19 पदे),(10) सहायक गट विकास अधिकारी, गट-ब (एकूण 25 पदे), (11) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब (एकूण 1 पदे),(12) उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब (एकूण 5 पदे),(13) कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता-मार्गदर्शन अधिकारी, गट-ब (एकूण 07 पदे),(14) सरकारी कामगार अधिकारी, गट – ब (एकूण 04 पदे),(15) सहायक प्रकल्प अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी/ प्रशासकीय अधिकारी/ संशोधन अधिकारी / गृहप्रमुख /प्रबंधक, गट-ब (एकूण 04 पदे),(16) उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब (एकूण 7 पदे),(17) सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी विकास आयुक्तालय, गट-ब (एकूण 52 पदे),(18) निरीक्षण अधिकारी (पुरवठा), गट-ब (एकूण 76 पदे),(दोन )
(2) महाराष्ट्र वनसेवा परीक्षा – महसूल व वन विभाग (एकूण48 पदे)
(1) सहायक वनसंरक्षक, गट-अ, (एकूण 32 पदे) ,(2) वनक्षेत्रपाल, गट-ब, (एकूण 16 पदे)
(तीन ) महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा – मृद व जल संधारण विभाग (एकूण 45 पदे)
(1) उपविभागीय जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-अ, (एकूण 23 पदे),(2) जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब, (एकूण 22 पदे).
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.