Exam paper leaks : राज्यात चाललंय काय? मृद व जलसंधारण विभागाचा पेपर फुटला, विद्यार्थी संतप्त

Exam paper leaks : राज्यात पुन्हा स्पर्धा परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमरावतीमधील मृद व जलसंधारण विभागाचा पेपर फुटल्याची घटना घडली आहे.
Exam paper leaks
Exam paper leaks Saam tv
Published On

अमर घटारे, अमरावती

competitive exam paper leak :

राज्यात पुन्हा स्पर्धा परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमरावतीमधील मृद व जलसंधारण विभागाचा पेपर फुटल्याची घटना घडली आहे. पेपर फुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात एकच गोंधळ केला. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी संतप्त भूमिका घेतली आहे. (Latest Marathi News)

राज्यातील अमरावतीत मृद व जलसंधारण विभागाचा पेपर फुटल्याची घटना घडली आहे. अमरावतीच्या ड्रीमलँडमधील एआरएन असोसिएट परीक्षा सेंटरवरील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

परीक्षेवर कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्याकडूनच एका विद्यार्थ्यांला उत्तरे कॉपी पुरवल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप केला आहे. पेपर फुटल्यानंतर विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला. विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Exam paper leaks
Maratha Protest : मनोज जरांगेंचं ठरलं! २४ फेब्रुवारीपासून पुन्हा मराठा आंदोलन; कशी असेल आंदोलनाची दिशा? जाणून घ्या

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने म्हटलं की, 'जलसंधारण अधिकारीच विद्यार्थ्यास चिट्टीद्वारे उत्तरे पुरवत होता. याच सेंटरवर तलाठीचा सुद्धा पेपर फुटला होता. या सरकारला अजून काय पुरावे पाहिजेत की हे झोपेचे सोंग करत आहेत'.

'अमरावतीच्या सेंटर ARN Associate या सेंटरवर तलाठीचा सुद्धा पेपर फुटला होता. तुम्हाला एक परीक्षा नीट घेता येत नाही, तर मग परीक्षा तरी का घेता.सर्व खाजगी सेंटर हे बोगस आहेत. तत्काळ WCD ची परीक्षा थांबवावी, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com