Yamaha FZ S Fi New Bike:
यामाहाच्या बाईक स्टायलिश लूक आणि पॉवरफुल इंजिनसाठी ओळखल्या जातात. अशातच आज कंपनीने आपली हाय मायलेज बाईक Yamaha FZ S Fi दोन नवीन रंग पर्यायात लॉन्च केली आहे. आता ही बाईक नवीन Ice Fluo-Vermillion आणि Cyber Green रंगांमध्ये देखील उपलब्ध असेल.
सध्या ही बाईक डार्क नाइट, मॅट ग्रे आणि मॅट रेड रंग बाजारात उपलब्ध आहेत. ही बाईक 1.22 लाख रुपयांच्या एक्स-शोरूमच्या प्रारंभिक किमतीत कंपनी ऑफर करत आहे. यामाहा बाईकमध्ये सॉलिड 149 सीसी इंजिन देण्यात आले अहे.
Yamaha FZ S Fi 5 स्पीड गिअरबॉक्ससह येते. यात मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बाईक रस्त्यावर 45 kmpl पर्यंत मायलेज देईल. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी यात 13 लिटरची मोठी इंधन टाकी आहे. रायडरच्या सुरक्षेसाठी, यात पुढील आणि मागील टायरवर डिस्क ब्रेक आहेत. या बाईकमध्ये स्टायलिश अलॉय व्हील देण्यात आले अहेत.
यामाहा बाईकमध्ये 2 प्रकार उपलब्ध आहेत. रस्त्यावर ही बाईक 115 kmph चा टॉप स्पीड देते. बाईकची सीटची उंची 790 मिमी आहे. ही बाईक 7250 rpm वर 12.2 bhp ची पॉवर जनरेट करते. बाईकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीची सुविधाही ग्राहकांना मिळेल.
हे 5500 rpm वर 13.3 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. बाईकमध्ये एलईडी हेडलाइट्स आणि टेललाइट्स देण्यात आलेत अहेत. Yamaha FZ S FI चे वजन 135 किलो आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.