iVOOMi JeetX ZE Launched In India:
इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी iVOOMi Energy ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर JeetX ZE लॉन्च केली आहे. ही फॅमिली स्कूटर आहे. या नव्या स्कूटरची एक लाख किलोमीटरपर्यंत टेस्ट घेण्यात आली आहे. ही स्कूटर डेव्हलप करायला कंपनीला सुमारे 18 महिन्यांचा कालावधी लागला. यात फक्त स्टायलिश डिझाईनच दिसत नाही, तर अनेक चांगले फीचर्सही ग्राहकांना पाहायला मिळतील.
नवीन iVOOMi JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर 3 प्रकारांमध्ये येते. याची किंमत 79,999 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. ही स्कूटर 8 रंगांमध्ये सादर करण्यात आली आहे. या नवीन स्कूटरची बुकिंग 10 मे पासून सुरू होणार आहे. ही स्कूटर 2.1kWh, 2.5kWh आणि 3kWh बॅटरी पॅकमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.
ही स्कूटर डिझाईनच्या बाबतीत स्टायलिश आहे. यामध्ये एक लांब सीट देण्यात आली आहे. ज्यामुळे त्यावर दोन व्यक्ती आरामात बसू शकतात. यात मोठी लेगरूम आणि बूट स्पेस आहे. त्यामुळे सामान ठेवण्यासाठी भरपूर जागा मिळते. या स्कूटरमध्ये 1350mm व्हीलबेस आहे.
ही स्कूटर जबरदस्त राइडिंग अनुभव देईल, असा कंपनीचा दावा आहे. स्कूटरमध्ये टर्न बाय टर्न नेव्हिगेशनचीही सुविधा आहे. या स्कूटरची बॅटरी IP67 ने सुसज्ज आहे. ज्यामुळे बॅटरी पाण्यामुळे खराब होणार नाही.
या नवीन स्कूटरमध्ये थर्ड जनरेशन बॅटरी पॅक आहे. ही स्कूटर पूर्ण चार्ज केल्यावर 170 किलोमीटरपर्यंतची रेंज देते, असा दावा कंपनीने केला आहे. यात काढता येण्याजोगा बॅटरी पॅक आहे. जो तुम्ही सहजपणे काढू शकता आणि चार्ज करू शकता. या स्कूटरच्या चेसिस, बॅटरी आणि पेंटवर 5 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे. भारतात ही स्कूटर ओला इलेक्ट्रिकशी स्पर्धा करेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.