केंद्र सरकारने मोजिला फायरफॉक्स वापरण्यावरून सावधानतेचा इशारा दिलाय. सायबर क्राइम आणि सायबर घोटळ्याचा शिकार कोणी होऊ नये, यासाठी सरकारने मोजिला फायरफॉक्स वापरण्यावर अलर्ट दिलाय. त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईल फोन, लॅपटॉपमध्ये मोजिला फायरफॉक्स वापरत असाल तर सावध व्हा. दरम्यान सरकारकडून देण्यात आलेला अलर्ट हा सरकारच्या कॅम्प्यूटर इमरजन्सी रिस्पांस टीमने दिलाय. CERT वेळोवेळी अशा अलर्ट देत असते. गेल्या काही दिवसांपासून सायबर क्राइममध्ये वाढ झालीय, यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. (Latest News)
बग्समुळे दिलाय अलर्ट
मोजिला फायरफॉक्स हे इंटरनेट बाऊजर करण्यासाठी वापरलं जातं. CERT-IN नुसार मोजिला फायरफॉक्समध्ये अनेक प्रकारचे बग्स आहेत. ज्याच्या माध्यमातून लॅपटॉप, मोबाईल, कॅम्प्यूटर वापरणाऱ्या व्यक्तीचा वैयक्तिक डेटा चोरी जाण्याची शक्यता आहे. वैयक्तिक माहिती चोरीला गेल्यानंतर सायबर फ्रॉडचे तुम्ही शिकार होऊ शकतात. त्यामुळे जर तुम्ही मोजिला फायरफॉक्स वापरत असाल तर सावध व्हा.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मोजिला फायरफॉक्सच्या या व्हर्जनमध्ये आहे सर्वाधिक बग्स
CERT-IN च्या रिपोर्टनुसार, मोजिला फायरफॉक्सच्या Firefox ESR versions before 115.5.0, Mozilla Thunderbird version before 115.5 किंवा Firefox iOS versions before 120 व्हर्जनचा वापर करत असाल तर हे धोकेदायक ठरू शकतं. जर तुमच्याकडे हे व्हर्जन असतील तर सावधान कारण यात सर्वाधिक बग्स असल्याचं समोर आलय. जर तुम्ही मोजिला फायरफॉक्सचा वापर करत असाल तर त्याला अपडेट करून टाका. यासह फायरफॉक्स ब्राउजरला ऑटोमटिक अपडेटमध्ये सेट करण्यास सांगण्यात आलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.