Surabhi Jayashree Jagdish
साऊथ इंडियन स्टाईल मसाला पोहे हे महाराष्ट्रातील कांद्यापोह्यांपेक्षा थोडे वेगळे असतात. त्यांना एक खास तिखट-आंबट-गोड चव असते.
या पोह्यांमध्ये डाळी आणि खास मसाल्यांचा वापर केला जातो. चला तर मग बघूया घरच्या घरी साऊथ इंडियन मसाला पोहे कसे बनवायचे.
जाड पोहे, तेल, मोहरी, जिरे, उडीद डाळ - १ मोठा चमचा, चणा डाळ - १ मोठा चमचा, शेंगदाणे - १/४ कप, कढीपत्ता, हिरवी मिरची, सुक्या लाल मिरच्या, हिंग, हळद, चिंचेचा कोळ, गूळ पावडर, मीठ, किसलेले खोबरे, कोथिंबीर
पोहे चाळणीत घेऊन एकदाच पाण्यातून हलकेच धुवा. नंतर धुतलेल्या पोह्यांमध्ये चवीनुसार मीठ आणि थोडी हळद घालून हलक्या हाताने मिक्स करून बाजूला ठेवा. पोहे मऊ होण्यासाठी साधारण ५-७ मिनिटे लागतील.
एका का मोठ्या कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घाला. त्यावर जिरे, उडीद डाळ आणि चणा डाळ घाला. डाळ सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
आता त्यात शेंगदाणे घालून मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळा. त्यानंतर कढीपत्ता, हिरवी मिरची आणि सुक्या लाल मिरच्या घाला. हिंग घालून चांगले परतून घ्या.
फोडणी तयार झाल्यावर त्यात चिंचेचा कोळ आणि गूळ पावडर घाला. हे मिश्रण चांगले परतून घ्या, गूळ पूर्णपणे विरघळला पाहिजे.
आता तयार यामध्ये भिजवलेले पोहे घाला. पोहे हलक्या हाताने, पण चांगले मिसळून घ्या, जेणेकरून मसाले पोह्यांच्या प्रत्येक कणाला लागेल. गॅस मंद आचेवर ठेवा. त्यानंतर पोहे एका प्लेटमध्ये काढून खोबरं-कोथिंबीर घालून छान सर्व्ह करा.