Upcoming Electric Vehicle: नवीन वर्षात लॉन्च होणार दमदार ईव्ही! फिचरसह पाहा संपूर्ण लिस्ट

Electric Vehicle: बाजारात सध्या इलेक्ट्रिक स्कूटरची क्रेझ आहे. भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. नवीन वर्षात दमदार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होणार आहे.
Upcoming Electric Vehicle
Upcoming Electric VehicleSaam Tv
Published On

Upcoming Electric Scooter In 2024:

बाजारात सध्या इलेक्ट्रिक स्कूटरची क्रेझ आहे. भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्या नवीन ईलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्यावर भर देताना दिसत आहेत. जर तुम्हीही नवीन ईलेक्ट्रिक स्कूटर घ्यायचा विचार करत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. येत्या काही दिवसात बाजारात अनेक ईलेक्ट्रिक स्कूटर लाँच होणार आहेत.

Ather

येत्या काही दिवसात बाजारात Ather ही नवीन ईलेक्ट्रिक स्कूटर लाँच होणार आहे. या स्कूटरची चाचणी घेण्यात येत आहेत. ही नवीन स्कूटर Ather 450 पेक्षा थोडी मोठी असू शकते. कंपनी २०२४ मध्ये ही नवीन स्कूटर बाजारात लाँच करणार आहे. २०२४ च्या पहिल्या ६ महिन्यात ही स्कूटर लाँच होऊ शकते.

Simple One

भारतात लवकरच Simple One ही नवीन स्कूटर लाँच करणार आहे. ही स्कूटर गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. जबरदस्त लूक आणि आधुनिक टेक्नॉलॉजीसह ही स्कूटर बाजारात लाँच होणार आहे. ही स्कूटर २१२ किमीची रेंज देऊ शकतो. या कंपनीच्या पहिल्या मॉडेलचे ५० युनिट्स विकले गेले आहेत. त्यानंतर आता हे दुसरे मॉडेल लवकरच लाँच होईल.

Upcoming Electric Vehicle
Gold Silver Rate (30th November): लग्नसराईत खरेदीदारांना दिलासा! सोन्याचा भाव ६५० रुपयांनी घसरला, मुंबई-पुण्यात आजचे दर किती?

Honda Activa EV

होंडा ही वाहन उत्पादनातील लोकप्रिय कंपनी आहे. होंडाची ईलेक्ट्रिक स्कूटर लवकरच बाजारात लाँच होणार आहे. Honda Activa EV २०२४ मध्ये लाँच होऊ शकते. परंतु कंपनीने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

Suzuki Burgman Electric Vehicle

मारुती सुझुकी कंपनी लवकरच आपली नवीन ईलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी Suzuki Burgman Electric स्कूटर लाँच करु शकतात. या स्कूटरची चाचणी खूप दिवसांपासून सुरु आहे. या स्कूटरची किंमत १ लाखांपर्यंत असू शकते.

Upcoming Electric Vehicle
Cheapest Electric Car : एका चार्जमध्ये गाठणार 250 किमीचा पल्ला, येतेय सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; बॅटरीची किंमत कमी झाल्याने होईल फायदा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com