Beed News: वाल्मिक कराडकडे सापडला स्पेशल फोन, भाजप आमदाराच्या दाव्याने खळबळ; बीड पोलिस संशयच्या भोवऱ्यात|VIDEO

BJP MLA Suresh Dhas: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडकडे जेलमध्ये स्पेशल फोन आढळल्याचा खळबळजनक दावा आमदार सुरेश धस यांनी केला आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्येचा मुख्य आरोपी वाल्मीक कराडला ठेवलेल्या तुरुंगांमध्ये स्पेशल फोन सापडला आहे. असा खळबळजनक दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. मागच्या काही महिन्यांपासून वाल्मीक कराड हा खंडणी आणि संतोष देशमुख हत्येप्रकरणी बीडच्या कारागृहात आहे. मात्र त्याला व्हीआयपी सुविधा मिळत असल्याचा आरोप काही दिवसापूर्वी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी देखील केला होता. यावरूनच आज आमदार सुरेश धस म्हणाले, जेलमधून एक स्पेशल फोन आता तो फोन सापडलेला आहे आणि विनंती एकच राहील मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. जो छोटा फोन आका वापरत होते. त्याचे डिटेल्स जर घेतले तर याच्यामधील सगळे काही जे आहे ते बाहेर येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com