Rules Change In December 2023 : वर्षाच्या शेवटच्या महिन्यात खिशाला कात्री बसणार? 1 डिसेंबरपासून बदलणार हे नियम

Rules Changes From 1st December : अवघ्या काही दिवसात डिसेंबर महिना सुरु होईल. अशातच वर्षाच्या शेवटच्या महिन्यात अनेक महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होईल.
Rules Change In December 2023
Rules Change In December 2023Saam Tv
Published On

Financial Rules :

अवघ्या काही दिवसात डिसेंबर महिना सुरु होईल. अशातच वर्षाच्या शेवटच्या महिन्यात अनेक महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होईल.

या नियमांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर, गॅस सिलिंडर, HDFC बँक आणि सिम कार्डचा समावेश असेल. एलपीजीच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी निश्चित केल्या जातात. व्यावसायिक आणि घरगुती सिलिंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी बदलल्या जातात. १ डिसेंबरपासून बदलणाऱ्या या नियमांबद्दल जाणून घेऊया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड

HDFC बँकेने (Bank) आपल्या Regalia क्रेडिट कार्डचे काही नियम बदलेले आहेत. हे नियम कार्डच्या लाउंज वापराबाबत आहेत. १ डिसेंबरपासून लाउंजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. रेगेलिया क्रेडिट कार्ड केवळ खर्चाच्या आधारावर लाउंजमध्ये प्रवेश करु शकणार आहे. लाउंज प्रवेशाचा लाभ घेण्यासाठी, क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना एका कॅलेंडर तिमाहीत १ लाख रुपये किंवा त्याहून अधिक पैसे (Money) खर्च करावे लागतील.

Rules Change In December 2023
Petrol Diesel Rate (29th November): पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? महाराष्ट्रात आजचे दर किती?

2. सिम कार्डसाठी नवे नियम

केंद्र सरकारने सिमकार्ड खरेदी-विक्रीचे नियम (Rules) बदले आहेत. हे नवीन नियम १ डिसेंबर २०२३ पासून संपूर्ण देशात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या नवीन नियमांच्या अमंलबजावणीनंतर एका आयडीवर मर्यादित प्रमाणात सिम खरेदी करता येणार आहे. तसेच नवीन सिम घेण्यापूर्वी केवायसी प्रक्रियेतून जावे लागेल.

3. एलपीजी किंमत

एलपीजी सिलिंडर, सीएनजी आणि पीएनजीच्या किमती प्रत्येक माहिन्याच्या १ तारखेला ठरतात. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी नवीन किमती जाहीर केल्या जातात. या काळात मागणी वाढल्याने लग्नाच्या काळात व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com