जर तुम्हाला धकाधकीच्या जीवनातून विश्रांती घ्यायची असेल, तर ही ठिकाणे मस्त फिरण्याचा प्लॅन तुम्ही करू शकता. बऱ्याच वेळेस फिरायचे झाले की, आपण आसपासच्या ठिकांणाजवळच फिरण्याचा प्लॅन करतो. मात्र आता थोडी लांबची ट्रिप तुम्हाला प्लॅन करता येणार आहे. त्यात हिवाळ्याची चाहूल भारताला लागलेली आहे. त्यात भन्नाट ठिकाणांना भेट देण्यासाठी तुमच्या मित्र-मैत्रिणींनसोबत तुम्ही ही ट्रीप एंजॉय करू शकता.
जर तुम्हालाही प्रवासाची आवड असेल, तर तुम्ही भारतातील या ठिकाणांना भेट देण्याची निश्चितच योजना करू शकता. ही ठिकाणे फिरून तुम्हाला खूप शांतता मिळेल. कामाचा ताण दूर होईल. धकाधकीच्या जीवनातून विश्रांती घेऊन एखाद्या अतिशय सुंदर जागेचा शोध घेतल्यास, तुमचा सर्व ताण दूर होईल आणि तुम्हाला आराम वाटेल. तज्ज्ञांच्या मते, प्रवास केल्याने तुमचे मन शांत होते. मात्र यासाठी योग्य ठिकाणी जाण्याचे नियोजन करावे. चला जाणून घेऊया अशाच काही ठिकाणांबद्दल, जिथे भेट दिल्याने तुमचे मन प्रसन्न होईल.
लडाख
जर तुम्हाला निसर्गाच्या आजूबाजूला राहायला आवडत असेल तर तुम्ही लडाखसारख्या अतिशय सुंदर ठिकाणी फिरण्याचा विचार करू शकता. लडाखचे सुंदर नजारे कोणाचेही मन जिंकू शकतात. या ठिकाणी काही दिवस घालवून तुम्ही खूप शांतता मिळवू शकता.
अंदमान आणि निकोबार
तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अंदमान निकोबार बेटांवरही जाऊ शकता. अंदमान आणि निकोबारमधील हिरवळ, वनस्पती आणि प्राणी भारत आणि परदेशातील पर्यटकांना आकर्षित करतात.
ऋषिकेश
जर तुमच्या आयुष्यात खूप ताण येत असेल तर तुम्ही ऋषिकेशला फिरण्याची योजना देखील बनवू शकता. या ठिकाणी तुम्हाला एक वेगळाच उत्साह जाणवेल. ऋषिकेश हे उत्तराखंडमधील हिमालयाच्या पायथ्याशी गंगा नदीच्या काठावर वसलेले शहर आहे.
धर्मशाला
तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही हिमाचल प्रदेशमध्ये असलेल्या अतिशय सुंदर धर्मशाळेला भेट देण्याची योजना देखील करू शकता. धर्मशाला हे हिरवेगार आणि डोंगरांनी वेढलेले ठिकाण आहे. यामुळेच लोक या ठिकाणी येऊन खूप शांतता आणि शांती मिळू शकते. दलाई लामा यांच्या कथांशी संबंधित असलेले हे ठिकाण भारतातील तिबेटी धर्म आणि संस्कृतीचेही केंद्र आहे. तुम्ही यापैकी कोणत्याही एका ठिकाणाला भेट देण्याचा विचार तुम्ही करू शकता.
Written By: Sakshi Jadhav