Monsoon Travel Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Monsoon Travel Tips : पावसाळ्यात ट्रिपचा प्लान करताय ? या गोष्टी लक्षात ठेवा, प्रवास होईल मजेशीर

How to Travel With Kids : जर तुम्ही देखील पावसाळ्यात सहलीची योजना करत असाल तर या गोष्टींची काळजी घ्या.

कोमल दामुद्रे

Tips For Travelling With Kids : पावसाळा हा अनेकांचा आवडचा ऋतू. या महिन्यात अनेकजण फिरण्याचा प्लान करतात. या ऋतूमध्ये अनेकांना निसर्गरम्य दृश्याचा आनंद घ्यायचा असतो. या वातावरणात हिरवाईने नटलेली वनराई पाहण्यासाठी अनेक जण आतूरतेने वाट पाहात असतात.

जर तुम्ही देखील पावसाळ्यात सहलीची योजना करत असाल तर या गोष्टींची काळजी घ्या. यामुळे तुमचा प्रवास मजेशीरही होईल व तुम्हाला त्याचा आनंद देखील घेता येईल. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

1. तिकीट बुक करा

जर तुम्ही पावसाळ्यात मुलांसोबत सहलीला जात असाल तर तुमची तिकिटे (Ticket) आधीच बुक करा. तुम्ही ट्रेनने प्रवास (Travel) करत असाल तर तुमचे येण्या-जाण्याचे तिकीट आधीच बुक करा. याशिवाय तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहात त्या ठिकाणी राहण्यासाठी अगोदरच हॉटेल बुक करा, ज्यामुळे तिथे पोहोचल्यानंतर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. मात्र, अनेकजण आपल्या गाडीतून फिरायलाही बाहेर पडतात. जर तुम्ही तुमच्या कारने सहलीला जात असाल तर आवश्यक टूल बॉक्स सोबत नक्कीच ठेवा.

2. ठिकाण

पावसाळ्यात फिरायला जाताना सर्वात महत्त्वाचे असते ती जागा. तुम्ही कोणत्या ठिकाणी (Place) फिरायला जाताय. पावसाळ्यात तुम्ही डोंगराळ भागात फिरायला जात असाल तर तुमची निवड चुकीची असू शकते. पावसाळ्यात दरड कोसळण्याचा धोका अधिक असतो. यामुळे डोंगराळ जागा निवडण्याऐवजी सपाट जागा निवडा. पावसाळ्यात भेट देण्यासाठी तुम्ही जयपूर, उदयपूर, भोपाळ, मांडू, इंदूर, बोधगया, राजगीर यासारख्या सर्वोत्तम ठिकाणांनाही भेट देऊ शकता.

3. वॉटरप्रूफ ट्रॅव्हलिंग बॅगमध्ये सामान ठेवा

तुम्ही वॉटरप्रूफ ट्रॅव्हलिंग बॅग सोबत ठेवावी ज्यामुळे पावसाळ्यात कोणत्याही वस्तूचे नुकसान होणार नाही. याचा वापर केल्याने कपड्यांपासून ते खाण्यापिण्यापर्यंतच्या वस्तू खराब होणार नाहीत. वॉटरप्रूफ ट्रॅव्हलिंग बॅग व्यतिरिक्त, तुम्ही रेन कोट देखील घेऊ शकता.

4. कपडे

जर तुम्ही पावसाळ्यात मुलांसोबत बाहेर जात असाल तर पावसाळ्यानुसार कपडे पॅक करावेत. स्वतःसाठी आणि मुलांसाठी लवकर सुकणारे कपडे पॅक करा. पावसाळ्यात सिंथेटक कपडे सोबत घ्यावे. यामुळे ते लवकर सुकतात. जाड आणि सुती कपडे पावसाळ्यात लवकर सुकत नाहीत. याशिवाय काही पातळ कपडेही पॅक करता येतात.

5. या टिप्स देखील फॉलो करा

  • कोणत्याही ठिकाणी जाण्यापूर्वी हवामानाचा अंदाज घेऊन मगच घराबाहेर पडा.

  • जर तुम्ही मुलांसोबत पावसाळ्यात फिरायला जात असाल तर इतर पदार्थांसह काही हेल्दी फास्ट फूड पॅक करायला विसरू नका.

  • याशिवाय सर्दी, ताप इत्यादी आजारांसाठी काही औषधे पॅक करायला विसरू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

Somwar Upay: सोमवारच्या दिवशी करा 'या' सोप्या उपायांनी मिळवा सुख-शांती; भगवान शंकरही होतील प्रसन्न

Raw Banana Curry Recipe: फक्त काही मिनिटांत बनवा हिरव्या केळ्याची स्वादिष्ट करी, वाचा स्टेप-बाय-स्टेप रेसिपी

Accident: वारकऱ्यांना घेऊन जाणारी एसटी बस रस्त्यावर उलटली, ३० प्रवासी गंभीर जखमी

CA Topper 2025: छत्रपती संभाजीनगरच्या लेकाचा देशात डंका! राजन काबरा CA परीक्षेत पहिला

SCROLL FOR NEXT