Monsoon Travel Trip : पावसाळ्यात या 5 ठिकाणी चुकूनही जाऊ नका, तुमच्या ट्रिपची लागेल वाट

5 Places You Must Avoid During Monsoon : या वातावरणात हिरवाईने नटलेली वनराई पाहण्यासाठी अनेक जण आतूरतेने वाट पाहात असतात.
Monsoon Travel Trip
Monsoon Travel Trip Saam tv
Published On

Places You Shouldn't Visit in India During Monsoon : पावसाळा म्हटलं की, अनेकांना निसर्गरम्य दृश्याचा आनंद घ्यायचा असतो. या वातावरणात हिरवाईने नटलेली वनराई पाहण्यासाठी अनेक जण आतूरतेने वाट पाहात असतात.

पावसाळा या ऋतूमध्ये अनेकजण फिरण्यासाठी अधिक प्लान करुन ठेवतात. अनेकांना पावसाळा खूप आवडतो. अशा परिस्थितीत या ऋतूत प्रवास करण्याची एक वेगळीच मजा आहे. जर तुम्हालाही पावसाळ्यात फिरण्याची आवड आहे आणि येत्या काही दिवसांत कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर या ठिकाणी चुकूनही जाऊ नका

Monsoon Travel Trip
Monsoon Trek : पावसाळ्यात ट्रेकिंगला जाण्याचा प्लान करताय? महाराष्ट्रातील ही 5 ठिकाणे ठरतील बेस्ट!

1. उत्तराखंड

उत्तराखंड हे भारतातील (India) एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे, येथे देशभरातून अनेक लोक भेट देण्यासाठी येतात. मैसुरी, नैनिताल आणि ऋषिकेश सारख्या हिल स्टेशन्ससह येथे भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. पण पावसाळ्यात (Monsoon) येथे मुसळधार पाऊस पडतो. यासोबतच येथे दरडी कोसळण्याची समस्याही कायम आहे. अशा परिस्थितीत पावसाळ्यात येथे प्रवास करणे कठीण आणि धोकादायक ठरू शकते.

2. हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशातील शिमला, मनाली आणि धर्मशाळा सारख्या लोकप्रिय पर्यटन (travel) स्थळांवर पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो. पावसामुळे येथे दरडी कोसळणे आणि रस्ते बंद होणे या सामान्य बाब आहेत. अशा परिस्थितीत येथे भेट देणे कठीण असू शकते.

Monsoon Travel Trip
Reverse Waterfall In Maharashtra: महाराष्ट्रातील या ठिकाणी वाहतो उलटा धबधबा, नजारा पाहून डोळे दिपतील

3. लडाख

लडाख आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी देशातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहे. हे सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी लाखो लोक या ठिकाणी येतात. मात्र पावसाळ्यात येथे न येण्याचा सल्ला दिला जातो. खरं तर, पावसामुळे, लेह-मनाली महामार्ग आणि लेह-श्रीनगर महामार्ग यांसारखे लडाखकडे जाणारे रस्ते भूस्खलनाचा धोका आहे आणि ते तात्पुरते बंद केले जाऊ शकतात.

4. गोवा

गोवा हे जगभरातील लोकप्रिय बीचचे ठिकाण आहे, परंतु पावसाळ्यात येथे मुसळधार पाऊस पडतो. यासोबतच पावसाळ्यात समुद्रकिनाऱ्याची पातळीही खूप वाढते. अशा स्थितीत या हंगामात पाण्यावर आधारित बहुतांश उपक्रम बंद राहतात. त्यामुळे या हंगामात येथे जाणे टाळा.

Monsoon Travel Trip
Weekly Rashibhavishy In Marathi : मिथुन-कन्याच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी तर कुंभने बाळगा सावधगिरी ! जाणून घ्या कसा असेल येणारा आठवडा

5. अंदमान आणि निकोबार

अंदमान आणि निकोबार बेटांवर पावसाळ्यात जोरदार पाऊस आणि जोरदार वारे येतात. अशा स्थितीत येथील वाहतूक व जलवाहतुकीत मोठी अडचण होत आहे. त्यामुळे तुम्हीही येत्या काही दिवसांत या बेटांना भेट देण्याचा विचार करत असाल तर तूर्तास येथे जाण्याचा बेत सोडून द्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com