Monsoon Places Near Mumbai : पावसाळा म्हटलं की, अनेकांना मस्त हिरव्यागार निसर्गात फिरायला आवडते. व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकांना फिरायला मिळत नाही. सुट्टीच्या दिवशी अनेकांना फिरण्याचे प्लान करायचे असतात.
वेळेच्या अभावामुळे नेमके कुठे जायचे हे कळत नाही. पण तुम्ही मुंबईत राहात असाल आणि वीकेंडला तुम्हाला फिरायला जायचे असेल तर आम्ही तुम्हाला असे काही ठिकाणे सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचा वींकेड बेस्ट होईल. आम्ही तुम्हाला एका दिवसात भेट देता येईल असे काही सर्वोत्तम पर्याय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही मित्र-मैत्रिणी, कुटुंबीय किंवा जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकता.
1. अलिबाग
अलिबाग हे महाराष्ट्रातील (Maharashtra) कोकण (Konkan) प्रदेशातील एक लहान किनारी शहर आहे, जे समुद्रकिनारे, व्हिला आणि निसर्गरम्य दृश्यांसाठी ओळखले जाते. अलिबाग हे मुंबई आणि पुणे या शहरांमधून वीकेंडला जाण्यासाठी खूप लोकप्रिय आहे. या ठिकाणी तुम्ही पॅरासेलिंग, बनाना राईड आणि जेट स्की आणि स्पीड बोटिंग यांसारख्या गोष्टी करु शकता. बहुतेक पर्यटक मुंबईपासून ९५ किमीचा प्रवास करून एक-दोन दिवस मुक्कामासाठी येतात.
2. लोणावळा
पुणे आणि मुंबईच्या जवळ असलेल्या पश्चिम घाटाच्या सह्याद्रीच्या रांगेत वसलेले, लोणावळा हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त भेट दिलेल्या हिल स्टेशन्सपैकी एक आहे आणि पावसाळ्यात येथे अनेक पर्यटक भेट देतात. सुंदर धबधबे (Waterfalls), तलाव आणि टेकड्यांसह, हे कॅम्पिंग, ट्रेकिंगसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून ६२४ मीटर उंचीवर वसलेले, लोणावळा हे दुहेरी हिल स्टेशनपैकी एक आहे - लोणावळा आणि खंडाळा - ज्यांना तुम्ही एकत्र भेट देऊ शकता. लोणावळ्यात भाजा लेणी, बुशी डॅम, कार्ला लेणी, राजमाची किल्ला, रायवूड तलाव इत्यादी लोकप्रिय पर्यटन स्थळे आहेत. लोणावळा अंधारबन ट्रेक सारख्या ट्रेकसाठी देखील लोकप्रिय आहे जो पिंपरी नावाच्या गावातून सुरू होतो आणि भिरा येथे संपतो. मुंबई ते लोणावळा हे अंतर 83 किमी आहे. येथे तुम्ही एक दिवसात जाऊन येऊ शकता.
3. एलिफंटा
मुंबई शहरापासून 11 किमी अंतरावर असलेल्या एलिफंटा किंवा घारपुरी बेटावर लेणी आहेत. गेटवे ऑफ इंडियावरून, तुम्ही फेरीने एलिफंटा लेणीपर्यंत पोहोचू शकता. गुहा मंदिरांचा हा संग्रह 5 व्या ते 7 व्या शतकातील आहे आणि त्यापैकी बहुतेक भगवान शिवाला समर्पित आहेत. एलिफंटा लेण्यांच्या ठिकाणी अल्कोव्हचे दोन गट आहेत, पहिला पाच हिंदू लेण्यांचा मोठा गट आणि दुसरा दोन बौद्ध लेण्यांचा लहान गट. हिंदू लेण्यांमध्ये शैव हिंदू पंथाचे प्रतिनिधित्व करणारी दगडी शिल्पे आहेत. मुंबई ते एलिफंटा लेणीचे अंतर 25 किमी आहे.
4. माळशेज घाट
माळशेज (Malshej) घाट हा महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात स्थित एक पर्वतीय खिंड आणि एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. अनेक तलाव, धबधबे, पर्वत आणि हिरवागार निसर्ग यामुळे माळशेज घाट गिर्यारोहक, ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींमध्ये लोकप्रिय आहे. हे ठिकाण केवळ मुंबईतीलच नाही तर पुणे आणि ठाण्यातील प्रसिद्ध वीकेंड स्पॉट मानले जाते. हे ठिकाण विशेषतः गुलाबी फ्लेमिंगोसाठी ओळखले जाते, जे जुलै आणि सप्टेंबरमध्ये येथे स्थलांतर करतात. माळशेज घाट त्याच्या सुंदर धबधबे आणि किल्ल्यांसाठी देखील लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. मुंबई ते माळशेज घाटाचे अंतर 127 किमी आहे.
5. वसई किल्ला
मुंबईतील वसई हे ठिकाण बॉलिवूड शूटिंगचे ठिकाण म्हणूनही ओळखले जाते. यामध्ये सिंहगड किल्ला, लोहगड किल्ला आणि मुरुड जंजिरा यांचा समावेश होतो. यात राजोडी, कलाम आणि सुरुची बीच सारखे काही प्रसिद्ध समुद्रकिनारे आणि काही चर्च आणि खुले उद्यान आहेत जिथे लोक फेरफटका मारतात. येथे आपण ट्रेनने सहज पोहोचू शकतो.
6. माथेरान
पश्चिम घाटावरील सह्याद्रीच्या रांगेत वसलेले, माथेरान हे समुद्रसपाटीपासून 2600 फूट उंचीवर आणि मुंबईपासून फक्त 100 किमी अंतरावर वसलेलेस हिल स्टेशन आहे, ज्यामुळे हे वीकेंड डेस्टिनेशन बनते. माथेरान हे भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन आहे, परंतु येथील निसर्गाचे दृश्य पर्यटकांना भूरळ पाडते. माथेरान हे जगातील अशा काही ठिकाणांपैकी एक आहे जिथे कोणत्याही वाहनांना परवानगी नाही, येथे जुन्या पद्धतीच्या मोटारगाड्या चालताना दिसतील. यात एकूण 36 व्ह्यूपॉईंट्स आहेत जिथून तुम्ही सह्याद्रीच्या पर्वताची मनमोहक दृश्यांचा आनंद घेऊ शकता.
7. कर्जत
शहर आणि निसर्गापासून दूर काही वेळ घालवायचा असेल तर कर्जतला भेट द्यायलाच हवी. वीकेंडच्या दिवशी तुम्ही विविध उपक्रम तुम्ही करु शकतात. कर्जतमधील प्रसिद्ध एनडी स्टुडिओला भेट देऊ शकता. येथे अनेक फॉर्महाऊस आहेत ज्याच्यामुळे तुमचा वीकेंड मजेशीर होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.