Masala Chai Recipe Saam TV
लाईफस्टाईल

Masala Chai Recipe : मुसळधार पावसात घ्या मसाला चहाचा आनंद; वाचा साहित्य आणि कृती

Monsoon Masala Chai : मसाला चहा तुम्ही कधी ना कधी बाहेर हॉटेलमध्ये प्यायला असेल. आता हाच चहा घरीच कसा बनवायचा त्यासाठी नेमकं काय साहित्य लागतं.

Ruchika Jadhav

चहा हे असं व्यसन आहे जे पूर्ण झाल्याशिवाय चैन पडत नाही. झोप टाळण्यासाठी व्यक्ती विविध पद्धतीचे चहा बनवून पितात. घरी आणि ऑफिसमध्ये देखील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चहा लागतोच. चहा घेतला नाही तर त्यांचं काम पूर्ण होत नाही. अनेक चहाप्रेमी विविध पद्धतीच्या चहाचं सेवन करणे पसंत करतात.

आता तुम्हाला सुद्धा रोजचा साधा चहा पिऊन कंटाळा आला असेल तर आम्ही तुमच्यासाठी चहाची एक भन्नाट रेसिपी आणली आहे. मसाला चहा तुम्ही कधी ना कधी बाहेर हॉटेलमध्ये प्यायला असेल. आता हाच चहा घरीच कसा बनवायचा त्यासाठी नेमकं काय साहित्य लागतं. तसेच त्याची परफेक्ट कृती काय आहे? याची माहिती आज जाणून घेऊ.

साहित्य

एक कप चहा पावडर

आर्धा कप साखर

७ ते ८ वेलची

एक चमचा आल्याची पावडर

एक कप दूध पावडर

एक कप दूध

कृती

मसाला चहा बनवण्यासाठी सर्वात आधी त्याचा मसाला तयार करून घ्या. त्यासाठी आधी एका मिक्सरच्या भांड्यात चहा पावडर, वेलची, आले हे सर्व एकत्र बारीक करून घ्या. मिक्सरला याची छान पावडर झाल्यावर एका भांड्यात थोडं पाणी घ्या.

गॅस ऑन करा आणि पाण्यात तयार मसाला टाका. हा मसाला छान उकळू द्या. त्यानंतर यामध्ये दूध पावडर टाकून घ्या. तसेच नंतर दूध देखील मिक्स करा. दूध थोडं गरम झाल्यावर यामध्ये साखर मिक्स करा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात मसाला आणि साखर मिक्स करू शकता. साखर टाकल्यावर याला छान उकळी येऊ द्या.

तयार झाला मस्त कडक चहा. हा चहा तुम्ही कोणत्याही स्नॅक्ससोबत सुद्धा पिऊ शकता. मसाला चहा पावसाळ्यामध्ये आपल्या आरोग्यासाठी फार गुणकारी असतो. त्यामुळे सर्दी, खोकल्याने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी हमखास या चहाचे सेवन केले पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

SCROLL FOR NEXT