EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

Sachin Dodake Raises Doubts: तब्बल 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी झालीय. मात्र ईव्हीएम पडताळणी अचानक थांबवण्यात आली आणि एकच गोंधळ उडाला...महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दोडकेंनी यावेळी काय आरोप केलाय? फेरमतमोजणीवेळी काय झालं
Sachin Dodake addressing the media after recount proceedings halted due to missing VVPAT slips at Khadakwasla
Sachin Dodake addressing the media after recount proceedings halted due to missing VVPAT slips at KhadakwaslaSaam Tv
Published On

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीनं ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा असल्याचा आरोप केला. त्यातच खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या ईव्हीएम पडताळणीला सुरुवात झाली. मात्र या प्रक्रियेत व्हीव्हीपॅट मशीन मधील वोटर स्लिप गहाळ असल्याचा आक्षेप घेण्यात आलाय. महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार सचिन दोडके यांनी हा आक्षेप घेतलाय. त्यानंतर तांत्रिक अडचण निर्माण झाली आणि एकूणच ही प्रक्रिया थांबवण्यात आली.

राज्यातील अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांनी फेर मतमोजणी घेण्याची मागणी केली होती. त्यात आजच्या प्रक्रियेत केवळ EVM मशिन पडताळणी आणि मॉक पोल याचीच तपासणी होणार होती. त्यानुसार तपासणी केल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी यांचं म्हणणं आहे. Evm मशीन मधील डेटा डिलिट केल्या शिवाय मॉक पोल घेता येत नसल्याचं अधिकाऱ्यांच म्हणणं आहे.

दरम्यान अधिकाऱ्यांनी दिलेल उत्तर समाधानकारक नसून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी दोडके यांनी केली आहे. याप्रकरणी निवडणूक आयोग काय सूचना देतं त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ईव्हीएमबाबतचा संशय कधी दूर होणार हाच खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com