राज्याला हादरवून सोडणाऱ्या हनी ट्रॅप प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलाय...ठाण्यातील एका होमगार्ड तरुणीने 72 उच्चपदस्थ अधिकारी, आमदार, खासदारांसह मंत्र्यांना हनी ट्रॅपच्या सापळ्यात अडकवून कोट्यवधींची खंडणी वसूल केल्याची चर्चा रंगलीय.... मात्र या हनी ट्रॅपची मोडस ऑपरेंडी नेमकी कशी आहे?
2016 मध्ये क्राईम ब्रांच अधिकारी म्हणून खंडणी मागितल्याप्रकरणी अटक
तुरुंगातून सुटल्यानंतर मुंबई, पुणे, नाशिक ठाणे भागात जाळं पसरवलं
गरजू, विधवा म्हणून अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना जाळ्यात ओढलं
हॉटेल मालकांशी संगनमत करुन अधिकाऱ्यांसोबत गुप्त कॅमेऱ्यांद्वारे व्हिडीओ रेकॉर्डिंग
बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत 40-50 लाखांच्या खंडणीची मागणी
याच हनी ट्रॅपमध्ये काही अधिकाऱ्यांनी खंडणी देऊन तडजोडी केल्या.. मात्र काहींनी इभ्रतीला घाबरुन तक्रारीच दिल्या नाहीत.... त्यामुळेच होमगार्ड असेलल्या हनीचं फावलं.... आणि हनी ट्रॅपमध्ये अडकून अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली...आता या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केलीय.
या प्रकरणाची गुप्तपणे चौकशी सुरु असल्याचं म्हटलं जातंय... मात्र हनी ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या होमगार्ड तरुणीसह आणखी या प्रकरणात कुणाकुणाचा सहभाग आहे? याच्या मुळापर्यंत जाऊन अनेकांचे संसार उध्वस्त होण्यास कारणीभूत ठरलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाची सीबीआय किंवा एसआयटीमार्फत चौकशी होणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.