Manasvi Choudhary
सध्या जोरदार पावसाचा सीझन सुरू आहे.
पावसात थंड वातावरणात गरमागरम चहा प्यायला अनेकांना आवडते.
पाऊस आणि थंडीपासून आराम मिळवण्यासाठी चहा हे उत्तम पेय आहे.
मसाला चहा घरच्या घरी कसा बनवायचा हे जाणून घ्या.
एका भांड्यात पाणी उकळून घ्या.
पाण्यामध्ये वेलची, काळी मिरी, किसलेले आले.दालचिनी,लवंग,जायफळ हे मसाले टाकून उकळून घ्या.
यानंतर यामध्ये साखर आणि चहाची पाने टाका.
दूध टाकून चहा मंद आचेवर उकळून घ्या
यानंतर गरम मसाला चहा चहाच्या कपमध्ये सर्व्ह करा.