Monsoon disease, Dengu fever ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Monsoon Disease : पावसाळ्यात डोकवर काढू पाहणाऱ्या संसर्गजन्य आजाराविषयी जाणून घ्या

पावसाळ्यात जागोजागी पाणी तुंबल्यामुळे संसर्गजन्य आजारांना सामोरे जावे लागते.

कोमल दामुद्रे

मुंबई : पावसाळा सुरु झाला की, वेगवेगळ्या संसर्गजन्य आजार हे डोक वर काढण्याचा प्रयत्न करत असतात. अनेकांना सर्दी- खोकला असे साथीचे रोग सतत होत असतात यामुळे रोगप्रतिकारशक्ती देखील कमी होते.

हे देखील पहा -

पावसाळ्यात सर्वात जास्त आजार वाढण्याची शक्यता असते. अशावेळी सर्वात जास्त दिसून येणारा आजार हा डेंगू आहे. डेंगू हा आजार मच्छर चावल्याने होतो. या आजाराच्या विळख्यात लहानांपासून - मोठ्यांपर्यंत कोणीही सापडू शकते. याची लक्षणे कधी कधी सामान्य तर कधी कधी गंभीर स्वरूपाची असतात. याविषयी वेळोवेळी आपल्या सर्तक राहायला सांगितले जाते.

हा आजार कसा होतो ? त्याची लक्षणे कोणती?

डेंगू हा व्हारयल ताप असून तो मच्छर चावल्याने होतो. डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या मच्छरांचे बायोलॉजिकल नाव हे एडीज एजिप्टी असे आहे त्याला टायगर मच्छर म्हणूनही ओळखले जाते. सुरुवातीच्या काळात ताप, डोकेदुखी, डोळेदुखी, हात-पाय दुखणे, थकवा येणे, चक्कर येणे, उलटी येणे, हाता-पायांवर लाल चट्टे येणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. तसेच ताप आल्यानंतर साधारणत: ३ ते ४ दिवसांत ही लक्षणे जाणवू लागतात. यामुळे पोटात दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, काहीही खाल्ल्यानंतर उलटी होणे, उलटी करताना रक्त पडणे, शरीरातील पेशी कमी होणे ही लक्षणे दिसू लागल्यावर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

उपाय व काळजी कशी घ्याल ?

अद्यापह या आजारावर कोणताही औषधे (Medicine) मिळालेले नाही. या आजारांत आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ लागते व पेशी देखील कमी होत जातात. त्यामुळे संसर्ग अजून वाढण्याचा धोका वाढतो. या रोगापासून सुरक्षित राहाणे आवश्यक आहे. ताप कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या (Doctor) सल्ल्यानुसार आपण पॅरासिटामॉलची गोळी घेऊ शकतो. तसेच आपल्या घरासमोर किंवा रिकाम्या जागी पाणी साचत असेल तर आपण ते साचू नये याची काळजी घ्यायला हवी. तिथे योग्य ती औषधांची फवारणी देखील करायला हवी. कूलरमध्ये असलेले पाणी सतत बदल रहा. घराबाहेर निघताना पूर्ण बाह्यांचे कपडे घाला.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : काल एक गद्दार म्हणाला जय गुजरात, हा गद्दार रुकेगा नही साला - उद्धव ठाकरे

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT