पावसाळ्यातील चविष्ट व हिरव्यागार अशा रानभाज्या !

पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्यांविषयी जाणून घ्या.
Rainy season vegetable, Ranbhajya, Monsoon vegetable
Rainy season vegetable, Ranbhajya, Monsoon vegetableब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : पावसाळा सुरु झाला की, सगळीकडे हिरवगार दिसत असते. पावसाळ्यात बाजारात रानभाज्या दिसू लागतात. नेहमी खाल्ल्या जाणाऱ्या भाज्यांपेक्षा या भाज्या दिसायला व चवीला वेगळ्या असतात.

हे देखील पहा -

पावसाळ्यात बाजारात गेल्यानंतर आपल्याला नवीन व काही वेगळ्या प्रकारच्या रानभाज्या दिसू लागतात. ज्या चवीला रुचकर, पौष्टिक व औषधीसुध्दा आहेत. ज्यामुळे पावसाळ्यात आपल्या प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. त्या रानभाज्या कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.

१. टाकळा ही रानभाजी असून ती पावसाळ्यात (Monsoon) उगवली जाते व तिला ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान फुले येतात. दिसायला अगदी मेथीच्या भाजीप्रमाणे असते परंतु, चवीला थोडी वेगळी लागते. ही भाजी त्वचेच्या सर्व रोगांवार परिणामकारक ठरते. या भाजीचे उष्ण गुणधर्म असल्यामुळे वात व कफदोषावर मात करण्यास मदत करते.

Rainy season vegetable, Ranbhajya, Monsoon vegetable
स्कूल बुलिंगचा मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर कसा परिणाम होतो, जाणून घ्या

२. पावसाळ्यात बरसणाऱ्या सरीत कुलुची भाजी सर्वत्र पाहायला मिळते. या भाजीला उगवण्यास जास्त वेळ लागत नाही. दिसायला गवतासारखी असून तिला कुलु किंवा काल्ला या नावाने ओळखले जाते.

३. कुरडूची भाजी ही जुना खोकला, कफविकार यासाठी फायदेशीर आहे. या भाजीचे कोवळी पाने शिजवून त्याची भाजी केली जाते. याच्या फळातील बिया किडनी स्टोनसाठी उपयुक्त ठरतात.

४. पावसाळ्यात उगवणारी कर्टोली ही फळभाजी जरी असली तरी ती, रानभाजी (Vegetable) आहे. दिसायला कारल्यासारखी असून तिची चव कडवट असते. या भाजीची वेल कारल्यासारखी असते. डोकेदुखीच्या कोणत्याही त्रासांवर ही भाजी फायदेशीर ठरते.

५. भारंग ही भाजी उगवण्यापूर्वी अर्थात कोवळी असताना तिला तोडले जाते. याच्या पानाच्या कडा या कडक व काटेरी असतात. यांच्या पानांमध्ये लोह भरपूर प्रमाणात असते यामुळे याचे सेवन अधिक प्रमाणात केले जाते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com