Beauty Skin Tips Saam TV
लाईफस्टाईल

Beauty Skin Tips : ऑफिसमध्ये आणि घरात सर्वात सुंदर तुम्हीच दिसाल; आठवड्यातून ४ वेळा चेहऱ्यावर लावा 'या' फुलाची पेस्ट

Mogra Flower For Glowing Skin : फुलांसारखं सुंदर आणि तेजस्वी दिसण्यासाठी तुम्हाला चेहऱ्यावर फुलांचा वापर करावा लागेल. आजवर तुम्ही गुलाबजल नक्कीच वापरलं असेल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुंदर दिसण्यासाठी अनेक तरुणी चेहऱ्यावर विविध प्रकारचे मेकअप करतात. चित्रपटांत दिसणाऱ्या अभिनेत्रींसारखं आपण अतिशय सुंदर दिसावं असं अनेक मुलींना वाटतं. बॉलिवूडचं 'फूलों सा चेहरे तेरा, कलियों सी मुस्कान है' हे गाणं तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. असं गाणं आपल्यासाठी देखील कुणी गायला हवं असंही तुम्हाला कधी ना कधी वाटलंच असेल. पण माझा चेहरा फार निस्तेज आहे आणि फुलांसारखा माझा चेहरा असल्याचं कोण म्हणणार नाही असा विचार तुम्ही करत असाल तर जरा थांबा. कारण आम्ही तुमच्यासाठी एक रामबाण उपाय शोधला आहे.

फुलांसारखं सुंदर आणि तेजस्वी दिसण्यासाठी तुम्हाला चेहऱ्यावर फुलांचा वापर करावा लागेल. आजवर तुम्ही गुलाबजल नक्कीच वापरलं असेल. मात्र त्याहून असरदार असं आणखी एक वेगळं फुलं आहे. हे फुल तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन बाजूला करते आणि स्किन ग्लो करण्यास मदत करते.

चेहऱ्यावर अप्लाय करा मोगऱ्याचं फुल

मोगरा या फुलांचा गजरा तुम्ही केसांत माळला असेल. आता हाच मोगरा तुमच्या चेहऱ्याचं सुद्धा सौंदर्य फुलवू शकतो. मोगऱ्याच्या फुलांमध्ये कोलेजन, एँटीऑक्सीडंट आणि एँटी एजिंग असे गुण आहेत. यामुळे चेहऱ्यावरील इलास्टिसिटी, रक्त प्रवाह व्यवस्तित राहते. तसेच चेहऱ्यावरील सुरकूत्या कमी होतात.

'नेशनल लाइब्रेरी ऑफ मेडिसिन' च्या अभ्यासानुसार, मोगरा या फुलात अनेक औषधी गुण आहेत. एँटीऑक्सीडंट, एँटी एजिंग आणि त्वचा गोरी करणारे अनेक गुण यात आहेत. सुंदर दिसण्यासाठी तुम्ही विविध पद्धतीने हे फुल चेहऱ्यावर अप्लाय करू शकता.

मोगरा फेस पॅक बनवण्यासाठी साहित्य

बीट

मोगरा

बदाम तेल

तुळशीची पाने

कृती

सर्वात आधी बीट छान उकडवून घ्या. त्यानंतर बीट स्मॅश करून त्यातील रस काढून घ्या. यामध्ये मोगऱ्याची फुलं, बदाम तेल आणि तुळशीची पाने अॅड करून मिक्सरला बारीक करून घ्या. ही पेस्ट आठवड्यातून ४ वेळा चेहऱ्यावर अप्लाय करा. त्याने चेहरा फार छान उजळून निघतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हिंगोलीमध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी घातला गोंधळ

India Fort : भारतातील सर्वात लहान किल्ला कोणता? उंची वाचून धक्काच बसेल

Weight Loss Mistakes: वजन कमी करताय? या 7 चुका करणं टाळा

धोंड्याच्या महिन्याचा स्पेशल बेत! लाडक्या जावयासाठी घरी बनवा चमचमीत 5 पदार्थ

पेट्रोलसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी पूर्णपणे माफ

SCROLL FOR NEXT