Shreya Maskar
जायफळ अँटी-ऑक्सिडंटने समृद्ध आहे. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी मदत करते.
तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी जायफळचा फेस पॅक आवर्जून लावा.
जायफळ पावडर, दही, मध हे पदार्थ जायफळाचा फेस पॅक तयार करण्यासाठी लागतात.
एका भांड्यात जायफळ पावडर, मध आणि दही घालून सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यावे.
तयार केलेला जायफळचा फेस पॅक ब्रशच्या साहाय्याने चेहऱ्यावर लावा.
१० मिनिटांनी लेप सुकल्यावर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा चेहऱ्यावर लेप लावा. त्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य खुलेल.
पिंपल्सच्या समस्येवर हा लेप रामबाण उपाय आहे.
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी जायफळचा फेस पॅक फायदेशीर ठरतो.
डोळ्यांखाली काळे डाग जास्त असल्यास नियमित कमी प्रमाणात रात्री झोपताना हा लेप लावा.
ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.