Shreya Maskar
मेकअपमधील ब्लश या प्रोडक्टमुळे स्त्रियांचे सौंदर्य छान खुलून येते.
बाजारात अनेक प्रकारचे महागडे ब्लश उपलब्ध आहेत.
तुम्ही घरातच काही पदार्थांचा वापर करून नैसर्गिक जेल ब्लश तयार करू शकता.
घरीच जेल ब्लश बनवण्यासाठी बीट पावडर, कोरफड जेल, कोको पावडर, हळद इत्यादी साहित्य लागते.
एका भांड्यात कोरफडीचा गर काढून त्यात बीट पावडर टाका हे दोन्ही पदार्थ छान एकजीव करून घ्यावे.
या ब्लशचा रंग अजून सुंदर येण्यासाठी त्यामध्ये कोको पावडर घाला.
शेवटी यामध्ये थोडी हळद घाला. यामुळे ब्लशचा परफेक्ट रंग येईल.
हे जेल ब्लश काचेच्या भांड्यात स्टोर करून फ्रिजमध्ये ठेवा.
गालावर ब्लश लावण्याआधी त्याची पॅच टेस्ट आवर्जून करा.
जेल ब्लश तेलकट त्वचेसाठी फायदेशीर आहे. ते त्वचेला हायड्रेट ठेवते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.