धोंड्याच्या महिन्याचा स्पेशल बेत! लाडक्या जावयासाठी घरी बनवा चमचमीत 5 पदार्थ

Manasvi Choudhary

अधिक मास

हिंदू धर्मात अधिक मासाला अत्यंत पवित्र मानले जाते. अधिक मास म्हणजेच धोड्यांचा महिना. या महिन्यात लाडक्या जावयाचा विशेष मान असतो.

Adhik Maas 2026

अधिक मास महत्व

अधिक मास हा महिना भगवान विष्णूना समर्पित आहे. या महिन्यात लाडक्या जावयाला भगवान विष्णूचे रूप मानून पूजा केली जाते. चांदीच्या किंवा ताब्यांच्या ताटात ओवाळणी करून धोंडा म्हणजेच भेटवस्तू दिली जाते.

Adhik Maas Importance

नैवेद्य

अधिक मासनिमित्त नैवेद्याला गोड पदार्थ अर्पण केले जाते. जावयाच्या खास पाहुणचारासाठी ५ पारंपरिक आणि चमचमीत गोड पदार्थं कोणते करावे? हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Dhondya Thali Recipes

पुरणपोळी

मराठमोळ्या सणाचा उत्साह वाढवण्यासाठी पुरणपोळी तुम्ही करू शकता. मऊ, लुसलुशीत पुरणपोळी आणि कटाची आमटी नक्कीच जेवणाची लज्जत वाढवेल.

Traditional Puranpoli | google

अनारसे

अधिकमासात जावयाला ३३ अनारसे देण्याची परंपरा आहे. तांदूळ भिजवून, गूळ आणि खसखस यापासून बनवलेले जाळीदार, खुसखुशीत अनारसे तुम्ही नैवेद्य दाखवा.

Anarse

गुलाबजाम

गुलाबजाम हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडता पदार्थ आहे. मऊ, रसाळ गुलाबजाम तुम्ही घरीच झटपट बनवू शकता.

Gulabjam

गोड शिरा

अधिक मास पूजेच्या धावपळीत तुम्ही कमी वेळात गोड शिरा बनवू शकता. रवा, दूध, साखर आणि ड्रायफ्रुट्स यापासून तुम्ही गोड शिरा बनवा.

Swwet Sheera

बासुंदी

दूध आटवून, त्यात केशर, वेलची आणि जायफळ घालून तयार केलेली घट्ट, मलईदार बासुंदी पुरणपोळीसोबत किंवा पुरीसोबत खायला भारीच लागते.

Basundi

NEXT: अधिक मासनिमित्त आईला भेटवस्तू द्या लिननच्या साड्या, हे 3 पॅटर्न ट्रेंडमध्ये

Linen Saree
येथे क्लिक करा...