पेट्रोलसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी पूर्णपणे माफ

Modi Governments Big Decision: पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षादरम्यान केंद्र सरकारनं पेट्रोलसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने २२ टक्के ते ३० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोलवरील उत्पादन शुल्क (एक्साईज ड्युटी) माफ केले आहे.
Modi Governments Big Decision
The Central Government has announced a complete excise duty waiver on 22% to 30% ethanol-blended petrol.saam tv
Published On
Summary
  • इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी पूर्णपणे माफ

  • पश्चिम आशियातील तणाव आणि तेल बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर निर्णय.

  • तेल आयात खर्च कमी करून ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढवण्याचा प्रयत्न.

पश्चिम आशियातील सुरू असलेले युद्ध आणि तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारताला तेलाच्या संकटापासून वाचवण्यासाठी आणि आत्मनिर्भरतेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय. एका अधिकृत अधिसूचनेद्वारे केंद्र सरकारने इथेनॉल-मिश्रित पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (एक्साईज ड्युटी) पूर्ण माफ करण्याची घोषणा केली आहे.

सरकारकडून बुधवारी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, २२ ते ३०टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोलला उत्पादन शुल्कातून (एक्साईज ड्युटी) सूट दिली जाणार आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी अस्थिरता दिसून येत आहे. याचा परिणाम ग्राहक तसेच वाहन उद्योगावर होतोय. पश्चिम आशियातील संघर्ष अजूनही सुरू असून 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्येही (होर्मुझची सामुद्रधुनी) व्यत्यय निर्माण झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Modi Governments Big Decision
Petrol Diesel Price : पश्चिम आशियातील तणावामुळे भारतीयांचं टेन्शन वाढलं! पेट्रोल-डिझेलचं दर वाढण्याची शक्यता, जाणून घ्या आजचे दर

जगातील देश सध्या सर्वात भीषण ऊर्जा-संकटांचा सामना करत आहेत. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल सुमारे ७० डॉलर्सवरून वाढून साधारणपणे १२६ डॉलर्सपर्यंत पोहोचल्या आहेत. सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचा केवळ पर्यावरणालाच फायदा होणार नाही, तर त्यामुळे परदेशी तेलावरील भारताचे अवलंबित्वही लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.

Modi Governments Big Decision
Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, २४ कॅरेट गोल्ड ₹४३०० नं स्वस्त, पाहा मुंबई-पुण्यातील ताजे दर

E-22 ते E-30 पेट्रोल आता करमुक्त

सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार २२ ते ३० टक्क्यांपर्यंत इथेनॉलचे मिश्रित पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी घेतली जाणार नाही. यामुळे आता बाजारामध्ये मिळणाऱ्या E-22, E-25, E-27 आणि E-30 श्रेणीतील पेट्रोलवर कंपन्यांना कोणत्याच प्रकारचा एक्साईज ड्युटी द्यावी लागणार नाही. करातील या मोठ्या सवलतीमुळे तेल कंपन्यांचा उत्पादन खर्च कमी होणार आहे आणि याचा थेट फायदा ग्राहकांना मिळण्याची शक्यता आहे. हे पेट्रोल बाजारात यायचे आहे. केंद्राने गेल्याच महिन्यात या मिश्रित पेट्रोलला मान्यता दिली होती. आता पेट्रोल पंपांवर २० टक्के ब्लेंड असलेले इ-२० पेट्रोल मिळत आहे. यात आणखी २ टक्के जरी इथेनॉल वाढले तरी त्याच्यावर हा निर्णय लागू होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com