सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये मोबाईल हा जीवनातला अविभाज्य घटक बनला आहे. सकाळी जाग आल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण मोबाईल पाहत असतो. त्यावेळेस त्याची चार्जिंग फूल असणं प्रत्येकालाच हवं असतं. मोबाईलची चार्जिंग कमी झाली त्याने मोबाईल पॉवर ऑफ झाला की बऱ्याच कामांचा खोळंबा होतो. काहीजण मोबाईलची चार्जिंग कमी होत असेल तर नवीन मोबाईलच विकत घेतात. पण तुमच्या मोबाईलमधल्या सेटिंग्स बंद करून तुम्ही दिवसभर मोबाईल फूल चार्ज ठेवू शकता.
मोबाईलमध्यल्या काही सेटिंग्स आपण नकळत चालू करतो किंवा त्याकडे लक्षच देत नाही. या कारणामुळे मोबाईल बंद होण्याची शक्यता जास्त असते. यासाठी सगळ्यात आधी तुम्ही मोबाइलचा स्क्रीन ब्राइटनेस कमी करा. साधारण ४० ते ५० टक्क्यांपर्यंत ठेवा आणि ऑटो-ब्राइटनेस सुरू करा, जेणेकरून आजूबाजूच्या प्रकाशानुसार स्क्रीन आपोआप अॅडजस्ट होईल. यासोबतच स्क्रीन टाइमआउट 30 सेकंद किंवा 1 मिनिटावर ठेवल्यास वापर नसताना स्क्रीन लवकर बंद होईल आणि बॅटरी सेव्ह होईल.
जर तुमच्या फोनमध्ये AMOLED किंवा OLED डिस्प्ले असेल तर डार्क मोड वापरा. डार्क मोडमध्ये काळ्या रंगासाठी कमी ऊर्जा लागते. डिस्प्ले सेटिंग्जमध्ये डार्क मोड सुरू करा आणि व्हॉट्सअॅप, ट्विटर, ब्राऊजरसारख्या अॅप्समध्येही तो वापरा. फक्त या बदलांमुळेच बॅटरीचा मोठा फरक जाणवू शकतो.
अनेक अॅप्स आपण उघडत नसतानाही बॅकग्राऊंडमध्ये सुरू असतात आणि हळूहळू बॅटरी संपवतात. बॅटरी सेटिंग्जमध्ये जाऊन आवश्यक नसलेल्या अॅप्ससाठी बॅकग्राऊंड वापर मर्यादित करा. आयफोन वापरकर्त्यांनी नको असलेल्या अॅप्ससाठी बॅकग्राऊंड अॅप रिफ्रेश बंद करावा. बॅटरी वापराची माहिती तपासल्यास कोणते अॅप जास्त बॅटरी खात आहे हे कळते. असे अॅप्स काढून टाकणे किंवा त्यांची मर्यादा घालणे फायदेशीर ठरते.
लोकेशन सेवा देखील बॅटरी मोठ्या प्रमाणात वापरतात. अॅप्सना दिलेली परवानगी ‘Always’ ऐवजी ‘While Using App’ अशी ठेवा. यामुळे GPS फक्त अॅप वापरत असतानाच चालू राहतो. तसेच वापरात नसताना Wi-Fi, ब्लूटूथ, मोबाईल डेटा आणि NFC बंद ठेवल्यास बॅटरी वाचते. कारण हे सगळे पर्याय सुरू असतील तर फोन सतत नेटवर्क शोधत राहतो.
नेटवर्क सिग्नल कमी असलेल्या भागात एअरप्लेन मोड सुरू केल्यास फोन जास्त बॅटरी खर्च करत नाही. थोडक्यात, नवीन फोन घेण्याऐवजी किंवा पॉवर बँकवर अवलंबून राहण्याऐवजी या सोप्या सेटिंग्ज बदलून पाहा. थोडेसे लक्ष दिल्यास तुमचा स्मार्टफोन दिवसभर तुमची साथ देऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.