
Online Fraud : हल्ली मोबाईल फोनचा वापर आपण सगळेच करतो. सध्या डिजिटलच्या युगात online fraud देखील सध्या सातत्याने वाढत आहे. आपण प्रत्येक गोष्टीत डिजिटलचा वापर करतो.
अशा परिस्थितीत अनेक वेळा लोक ऑनलाइन फसवणुकीला बळी पडतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Tips) सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा फोन हॅक होणार नाही व सुरक्षित राहिल.
rajchoudhary_upcomingworld या इंस्टा युजरने Android phone वापरकर्त्यांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्याने टेकनॉलॉजी संबंधीत काही ट्रिक्स सांगितल्या आहेत ज्याचा वापर करुन आपण आपला फोन सुरक्षित ठेवू शकतो.
1. पहिल्यांदा आपल्याला आपल्या फोनमधल्या Settings वर जाऊन Google वर क्लिक करा. त्यानंतर Data Privacy वर जा. त्यात location history वर क्लिक करुन Turn Off करा. ज्यामुळे Google तुमचे लोकशन दाखवणार नाही व मोबाइल हॅक होण्यापासून तुम्ही वाचवू शकता
2. आपल्या फोनमधल्या Settings वर जाऊन Search करायचे आहे Nearby wifi off करा. यामुळे तुमचा फोन कोणीही कनेक्ट करणार नाही. ज्यामुळे तुम्ही तुमचा फोन हॅक होण्यापासून वाचू शकता
3. पुन्हा आपल्याला फोनमधल्या Settings वर जायचे आहे. त्यावर Lock Screen Notification वर क्लिक करा. तिथे Hide contact ला Turn on करा. ज्यामुळे Lock Screen वर येणारी Notification कोणाला वाचता येणार नाही.
4. पुन्हा आपल्याला फोनमधल्या Settings वर जायचे आहे. त्यात Data Saving वर जाऊन Turn off करा ज्यामुळे तुमची बॅटरी सेव्ह होईल.
5. पुन्हा Settings वर जाऊन Google वर क्लिक करा. त्यात Data and Privacy वर जा त्यात personalize ads वर क्लिक करुन Turn Off करा. ज्यामुळे आपल्याला सतत येणारा Ads या थांबवता येतील
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.