ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुमचा अँड्रॉइड फोन हँग होतोय किंवा कॉल रिसीव्ह करताना अडचण येतेय का?
यावर काही ट्रिक्स आहेत. त्याद्वारे ही समस्या सोप्या रितीने दूर करता येईल.
ही समस्या दूर करण्यासाठी तीन सेटिंग आहेत, ज्याद्वारे फोन तुम्ही घरच्या घरी दुरुस्त करू शकता.
अँड्रॉइडमध्ये छोट्या-मोठ्या समस्यांमुळं फोन हँग होतोय. तर काही वेळा कॉलही रिसीव्ह करता येत नाही.
ही समस्या दूर करण्यासाठी फोन रीबूट करू शकता. अशी समस्या कधी आलीच तर फोन रिस्टार्ट किंवा रिबूट करा.
ही ट्रिक वापरून समस्या दूर होत नसेल तर, फ्लाइट मोडही ट्राय करा. फ्लाइट मोड फोनला सेल्युलर नेटवर्कपासून डिस्कनेक्ट करतो.
अनेकदा आपला फोन नेटवर्क कव्हरेज क्षेत्रात आहे की नाही हे पाहणं अनेकदा आपण विसरतो.
त्यामुळे तुम्ही नेटवर्क कव्हरेज क्षेत्रात आहात की नाही? हे सुनिश्चित करा.
इनकमिंग कॉल प्राप्त करण्यासाठी किंवा आउटगोइंग कॉल करण्यासाठी फोन कव्हरेज क्षेत्रात असणे गरजेचे आहे.