Mishti Doi  Saam TV
लाईफस्टाईल

Mishti Doi : बंगाली स्टाईल मिष्टी दही खाल, तर महागड्या मिठाईलाही विसराल; वाचा साहित्य आणि रेसिपी

Mishti Doi Recipe : सहसा दह्यामध्ये साखर किंवा गुळ टाकून खातो. बंगालमध्ये दह्यापासून बनवली जाणारी मिष्टी दही हा पदार्थ फार फेमस आहे. अनेक व्यक्ती उन्हाळ्यात या पदार्थावर ताव मारतात.

Ruchika Jadhav

विविध राज्यांनुसार तेथील खाण्यापिण्याच्या गोष्टी, पोशाख यांमध्ये विभिन्नता जाणवते. प्रत्येक राज्यानुसार आणि जिल्ह्यानुसार भाषेसह खाद्यपदार्थांमध्ये बदल दिसतो. सध्या उन्हाळा सुरू आहे. त्यात तुम्ही सर्वजण दही, लस्सी, ताक असे पदार्थ नक्की खात असाल. आपण सहसा दह्यामध्ये साखर किंवा गुळ टाकून खातो. बंगालमध्ये दह्यापासून बनवली जाणारी मिष्टी दही हा पदार्थ फार फेमस आहे. अनेक व्यक्ती उन्हाळ्यात या पदार्थावर ताव मारतात.

दह्यासारखेच मात्र चवीला गोड असलेलं मिष्टी दही महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी बनवलं जातं. याची चव सर्वानाच आवडते. जेवणात तुम्हाला गोड खाण्याची सवय असेल तर तुमच्यासाठी ही स्विट डिश परफेक्ट आहे. त्यामुळे आज बंगाली स्टाईल मिष्टी दही नेमकं कसं बनवायचं याची महिती जाणून घेऊ.

साहित्य

फुल फॅट दूध

दही

साखर

कृती

सर्वात आधी तुमच्या घरी असलेलं दही एका सुती कापडात बांधुन त्यातील पाणी गाळून घ्या. त्यातील अतिरिक्त सर्व पाणी निघून जाईल अशा ठिकाणी कापड लटकवत ठेवा. त्यानंतर गॅसवर दूध तापवून एक उकळी काढून घ्या. तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर एका भांड्यात साखरेचा पाक बनवा. साखरेचा पाक आपल्याला जास्त घट्ट बनवायचा नाही. त्यामुळे कमी गॅसवर पाक बनवून घ्या.

तयार पाकात थोडंसं दूध अॅड करा. पाक असल्याने दूधाचा गोळा होईल. मात्र तसेच संपूर्ण दूध मंद गॅसवर गरम करत राहा. त्यानंतर संपूर्ण दूध या साखरेच्या पाकात मिक्स करून घ्या.यामुळे दह्याला थोडासा काळपट चॉकलेटी रंग येईल.

पुढे तयार दूध पूर्णत: थंड करून घ्या. त्यानंतर एक मातीचं भांडं घ्या. त्यात सर्व बाजूंनी दही लावून घ्या. दही लावल्यानंतर या दूधामध्ये देखील २ चमचे दही मिक्स करा. त्यानंतर यावर झाकन ठेवून एका टॉवेलमध्ये गुंढाळून ठेवा. दुसऱ्या दिवशी तयार झाली तुमची मलईसारखी मिष्टी दही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक गेमचेंजर ठरणार? रेड्डी की राधाकृष्णन, कोण मारणार बाजी?

फोनवर बोलणं, गाणं ऐकणं नकोच! PMPML च्या कंडक्टर- ड्रायव्हरसाठी नवे नियम

Workout Tips: सकाळी व्यायाम करायच्या आधी काय खावे?

Fact Check : कपड्यांच्या शोरूममध्ये भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Shocking : ऑनलाइन डेटा चोरी, महिलेचे नग्नावस्थेतील फोटो, व्हिडीओ व्हायरल; कंपनीवर खटला दाखल

SCROLL FOR NEXT