Mumbai Local Train Saam TV
लाईफस्टाईल

Mumbai Local Train : मुंबईकरांची लवकरच गर्दीतून होणार सुटका, लोकल ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्याच्या रेल्वे मंत्रालयाकडून सूचना

Union Minister of Railways Ashwini Vaishnaw : दिवसेंदिवस लोकल ट्रेनची गर्दी वाढतच चालली आहे. मात्र आता काही दिवसांतच मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होण्याची शक्यता आहे.

Ruchika Jadhav

मुंबईमधील झगमग आणि श्रीमंतीसह मुंबईची ओळख सांगताना लोकल ट्रेनला कधीच वगळता येणार नाही. कारण लोकल ट्रेन म्हणजे मुंबईची लाईफलाईन आहे, असं म्हटलं जातं. याच लोकल ट्रेनने दररोज लाखे नागरिक प्रवास करतात. दिवसेंदिवस लोकल ट्रेनची गर्दी वाढतच चालली आहे. मात्र आता काही दिवसांतच मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होण्याची शक्यता आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेमार्फत करण्यात आलेल्या मान्सूनच्या तयारीचा आढावा घेतला आहे. यावेळी विविध सूचना देत त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना लोकलच्या फेऱ्या आणखी कशा वाढवल्या जातील यावर काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबई लोकलच्या फेऱ्या वाढणार असून आपला प्रवास आणखी सोयीचा होऊ शकतो.

रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक

देशभरात पावसाचा जोर आता वाढत चालला आहे. त्यामुळे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्सूनच्या तयारीचा आढावा घेतला आहे. भविष्यातील पायाभूत सुविधांच्या कामांच्या योजनांचाही त्यांनी आढावा घेतला. लोकल फेऱ्यांबाबत सूचना देताना ते म्हणाले की, "भविष्यात मुंबईतील लोकल फेऱ्या वाढविण्याबाबत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे."

बैठकी दरम्यान त्यांनी नाल्यांची पाहणी, मायक्रो टनेल, ड्रोन तैनाती, रिमोट कंट्रोल्ड फ्लोटिंग कॅमेरे, नवीन नाले बांधणे, कल्व्हर्ट या कामांबाबत चर्चा केली. प्रवाशांच्या सोयीसाठी भविष्यात लांबपल्ल्याच्या गाड्या चालवण्याबाबत देखील यावेळी चर्चा करण्यात आली आहे.

मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करताना मध्य रेल्वे स्थानकांवरील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. मुंबईहून कर्जत आणि कसारा अशा लांबपल्ल्याच्या गाड्या फार कमी आहेत. शिवाय कल्याणपर्यंत या ट्रेन जलद मार्गांवर चालवल्या जातात. मात्र तरीही गर्दीमुळे अनेकांना ट्रेनमध्ये चढता सुद्धा येत नाही. कर्जत, खोपोली, कसारा आणि आसनगाव या ट्रेन एकदा गेल्या की पुन्हा एक तास वाट पहावी लागते. त्यामुळे प्रवाशांचे फारच हाल होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar setback : अजित पवारांना जोरदार धक्का, ४३ पदाधिकार्‍यांचा एकच वेळी 'जय महाराष्ट्र', निवडणुकीआधी राष्ट्रवादीला खिंडार

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाला मंजूरी तर मिळाली, पण कधीपासून लागू होणार? संभाव्य तारीख वाचा

Election News : राज्यात तीन टप्प्यांत निवडणुका? पुढील आठवड्यात बिगुल वाजणार ? | VIDEO

Airtel Cheapest Plan: घरात Wifi आहे? मग 'हा' एअरटेल प्लॅन तुमच्यासाठी आहे सर्वोत्तम, जाणून घ्या फायदे

Maharashtra Live News Update : मुंबईतील आझाद मैदानमध्ये मविआचे आंदोलन

SCROLL FOR NEXT