Asangaon Railway Station : लोकलची वाट पाहणाऱ्या नर्सचा विनयभंग; आसनगाव रेल्वे स्थानकावरील प्रकार, तरुण पोलिसांच्या ताब्यात

Kalyan News : ६ जूनला रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी कामावर जाण्यासाठी आसनगाव रेल्वे स्टेशनवर लोकल ट्रेनची वाट पाहत होती.
Asangaon Railway Station
Asangaon Railway StationSaam tv

अभिजित देशमुख
कल्याण
: कामावर जाण्यासाठी आसनगाव रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनची वाट पाहणाऱ्या नर्ससोबत एका तरुणाने अश्लील हाव भाव करत तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला असून या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी निलेश गायकवाड या विकृत तरुणाला ताब्यात घेतले आहे. 

Asangaon Railway Station
Gadchiroli Scam : गडचिरोलीत ६ कोटींचा धान घोटाळा; दोघांना अटक

आसनगाव येथे वास्तव्यास असलेली पीडित तरुणी नर्स म्हणून एका खाजगी रुग्णालयात काम करते. दरम्यान ६ जूनला रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी कामावर जाण्यासाठी आसनगाव रेल्वे स्टेशनवर लोकल ट्रेनची वाट पाहत होती. या दरम्यान निलेश गायकवाड त्या ठिकाणी उभा होता. (Crime News) निलेशने या तरुणीकडे पाहून अश्लील हावभाव केले. इतकेच नव्हे तर तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. 

Asangaon Railway Station
Pune Sasoon Hospital : धक्कादायक..ससून रुग्णालयातून रुग्णाचे पलायन; रुग्णाच्या पत्नीची पोलिसात तक्रार

अचानक घडलेल्या या  प्रकारामुळे तरुणी घाबरली. तरुणीने आरडाओरड करत गस्तीवर असलेल्या पोलिसांना (Railway Police) ही घटना सांगितली. सदर प्रकार घडल्यानंतर रेल्वे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत निलेश गायकवाड याला ताब्यात घेतले आहे. निलेश गायकवाड हा याच परिसरात राहत असून तो चालक आहे. कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत निलेश गायकवाड याला बेड्या ठोकल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com