Pune Sasoon Hospital : धक्कादायक..ससून रुग्णालयातून रुग्णाचे पलायन; रुग्णाच्या पत्नीची पोलिसात तक्रार

Pune News :दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास वॉर्डमधील साफ सफाईसाठी रुग्णाच्या नातेवाईकांना तेथील कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले
Pune Sasoon Hospital
Pune Sasoon HospitalSaam tv
Published On

पुणे : काविळ झाला असल्याने उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान सकाळी वार्डाची सफाई करण्यासाठी कर्मचारी आले असता त्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना थोडा वेळ बाहेर जाण्यास सांगितले. याची संधी साधून सदर रुग्ण हा पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विठ्ठल बापूराव ढवळे (वय ३५) असे या रुग्णाचे नाव असून याबाबत रुग्णाच्या पत्नीने बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.

Pune Sasoon Hospital
Lonavala News : लोणावळ्यात गुटखा विक्री; पोलिसांची पाच टपरी धारकावर कारवाई

पुण्यातील (Pune) ससून रुग्णालयात उषा ढवळे या त्यांचे पती विठ्ठल ढवळे यांना उपचारासाठी २९ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आणले होते. कावीळ तसेच फिट येण्याचा त्रास असल्याने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केलं होत. यामुळे त्यांना वार्ड नं ४० आपत्कालिन विभाग येथे प्राथमिक उपचार करून डॉक्टरांनी वार्ड नं ३ मध्ये पुढील उपचाराकरीता दाखल करून घेतले. तर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास वॉर्डमधील साफ सफाईसाठी रुग्णाच्या नातेवाईकांना तेथील कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले. 

Pune Sasoon Hospital
Gadchiroli Scam : गडचिरोलीत ६ कोटींचा धान घोटाळा; दोघांना अटक

यावेळी उषा ढवळे देखील वॉर्डच्या बाहेर येवून थांबल्या होत्या. त्यानंतर साधारण १० वाजेच्या सुमारास उषा ढवळे या वॉर्डात गेल्या असता तेथे त्यांचे पती विठ्ठल ढवळे हे जागेवर नव्हते. यानंतर त्यांनी संपुर्ण ससून हॉस्पीटल परिसर तसेच बसस्थानक, रेल्वे स्टेशन परिसर व आजुबाजुच्या परिसरात शोध घेतला असता त्यांचे आढळून आले नाही. याबाबत ससून रुग्णालय प्रशासनाला सांगितले असता याकडे दुर्लक्ष केलं. कोणीही लक्ष न दिल्याने अखेर चार दिवसांनंतर उषा ढवळे यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पती विठ्ठल बापुराव ढवळे हे हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com