Male infertility treatment saam tv
लाईफस्टाईल

Male infertility treatment: २५-४० वयोगटातील पुरुषांचा स्पर्म काऊंट घटतोय; कसे केले जातात या समस्येवर उपचार?

Low sperm count causes and treatment: पूर्वी वंध्यत्वाची (Infertility) समस्या फक्त महिलांशी जोडली जायची, पण आता अनेक संशोधनांमधून हे स्पष्ट झाले आहे की, पुरुषांमध्येही प्रजनन क्षमतेची (Male Fertility) समस्या वाढत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

  • तरुणांमध्ये शुक्राणूंच्या संख्येत घट होत आहे.

  • ॲझोस्पर्मिया म्हणजे वीर्यात शुक्राणू नसणे.

  • ऑब्स्ट्रक्टिव्ह आणि नॉन-ऑब्स्ट्रक्टिव्ह हे दोन प्रकार आहेत.

२५ ते ४० वयोगटातील अनेक तरुणांमध्ये शुक्राणूंच्या संख्येत चिंताजनक घट होत असल्याचं समोर आलं आहे. वेळेवर प्रजनन तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास या समस्येचं निदान होऊ शकते आणि उपचारही सुरू करता येतात. अँटीऑक्सिडंट्स, हार्मोनल थेरपी किंवा इंट्रासाइटोप्लाज्मिक स्पर्म इंजेक्शन (ICSI) हे काही पर्याय आज उपलब्ध आहेत. पालकत्वाचे स्वप्न पाहणाऱ्या जोडप्यांनी अशा परिस्थितीत वेळ न दवडता तपासणी करून आवश्यक उपचार घेणे गरजेचे आहे.

मुंबईच्या अंधेरीत राहणारे ३५ वर्षीय इशान कुमार (नाव बदललेले आहे) यांच्या लग्नाला दोन वर्षे झाली होती. गेल्या वर्षभरापासून ते बाळासाठी प्रयत्न करत होते, पण यश मिळत नव्हतं. तपासणीत शुक्राणूंची संख्या शून्य असल्याचं स्पष्ट झालं.

पुढील तपासणीत शुक्राणू वाहून नेणाऱ्या नलिकेत अडथळा आढळला आणि त्यांना ॲझोस्पर्मिया असल्याचे निदान झालं. वेळेत सूक्ष्म शस्त्रक्रिया आणि उपचार घेऊन Sperm retrieval करण्यात आलं. त्यानंतर आयसीएसआय पद्धतीने उपचार करून मे २०२५ मध्ये या दाम्पत्याने एका निरोगी बाळाला जन्म दिला.

ॲझोस्पर्मिया म्हणजे नेमकं काय?

ॲझोस्पर्मिया ही अशी स्थिती आहे, जिथे वीर्यामध्ये एकही शुक्राणू आढळत नाही. एकूण लोकसंख्येतील जवळपास १% पुरुष आणि वंध्यत्वाचा सामना करणाऱ्या ५ ते १०% पुरुषांमध्ये ही समस्या दिसते. अंदाजानुसार, तीन महिन्यांत २० पैकी २ पुरुषांना ॲझोस्पर्मियाचे निदान होतं.

या स्थितीचे दोन प्रकार असतात –

  • ऑब्स्ट्रक्टिव्ह ॲझोस्पर्मिया, ज्यात शुक्राणू तयार होतात पण नलिकेत अडथळ्यामुळे वीर्यात येऊ शकत नाहीत.

  • नॉन-ऑब्स्ट्रक्टिव्ह ॲझोस्पर्मिया, ज्यात अनुवंशिकता, हार्मोनल बदल किंवा आरोग्याच्या समस्या यामुळे वृषणांमध्येच शुक्राणूंची निर्मिती होत नाही.

धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा, रसायनांचा किंवा जास्त उष्णतेचा संपर्क, संसर्ग, जुन्या शस्त्रक्रिया किंवा केमोथेरपीसारखे उपचार हे घटकही शुक्राणू निर्मितीवर परिणाम करू शकतात. काही वेळा कामवासना कमी होणं, हाडांची घनता कमी होणं किंवा वृषणांना सूज येणं अशी हार्मोनल असंतुलनाची लक्षणेही दिसतात.

वेळेत उपचार न केल्यास या समस्येमुळे मानसिक तणाव, नैराश्य, नातेसंबंधातील ताण आणि दीर्घकालीन वंध्यत्वाचा सामना करावा लागू शकतो. लाज, आत्मविश्वासात घट आणि सामाजिक उपहासाची भीती यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनू शकते.

नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी, विरार मधील फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. ज्योत्स्ना पलगामकर यांनी सांगितलं की, "प्रजनन मूल्यांकनादरम्यान वीर्य विश्लेषण होईपर्यंत अनेक पुरुषांना माहित नसतं की, त्यांना अ‍ॅझोस्पर्मिया किंवा त्यांच्यात शुक्राणूंची संख्या कमी आहे. आता, आधुनिक प्रजनन औषधांमुळे, शून्य शुक्राणूंची संख्या असलेले पुरुष देखील पालकत्वाचा आनंद घेऊ शकतात. अ‍ॅझोस्पर्मिया असलेले पुरुष शुक्राणू पुनर्प्राप्ती, आयसीएसआय किंवा दात्याच्या शुक्राणूसारख्या उपचारांद्वारे पालकत्वाचं स्वप्न पूर्ण करु शकतात. यासाठी वेळीच निदान आणि प्रजनन तज्ञांकडून मार्गदर्शन गरजेचं आहे.

ॲझोस्पर्मिया म्हणजे काय?

वीर्यामध्ये एकही शुक्राणू नसण्याची स्थिती म्हणजे ॲझोस्पर्मिया.

शुक्राणूंच्या संख्येवर परिणाम करणारे घटक कोणते?

धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा आणि हार्मोनल बदल.

ॲझोस्पर्मियाचे कोणते दोन प्रकार आहेत?

ऑब्स्ट्रक्टिव्ह आणि नॉन-ऑब्स्ट्रक्टिव्ह ॲझोस्पर्मिया.

शुक्राणू नसल्यास पालकत्व कसे शक्य आहे?

ICSI, शुक्राणू पुनर्प्राप्ती किंवा दात्याच्या शुक्राणूंद्वारे.

वेळेत उपचार न केल्यास कोणत्या समस्या येऊ शकतात?

मानसिक तणाव, नैराश्य आणि दीर्घकालीन वंध्यत्व.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange patil protest live updates: बीडच्या आष्टी तालुक्यात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कडकडीत बंद

Amalner Crime : जन्मदात्या बापाला मुलाने संपविले; खुनाच्या घटनेने अमळनेरात खळबळ

CSMT स्थानकात मराठा आंदोलकांचा गोंधळ, रूळावर उतरून लोकल अडवली, VIDEO समोर

Shocking: भयंकर! बहीण तरूणाच्या प्रेमात पडली, भावाच्या डोक्यात हैवान घुसला, चाकूच्या धाकावर दोनदा बलात्कार

Maharashtra Weather : पुन्हा जोरधार! पुढील २४ तास १७ जिल्ह्यात अति मुसळधार, IMD ने दिला इशारा

SCROLL FOR NEXT