
डेंग्यूमुळे एन्सेफलायटिससारख्या गंभीर गुंतागुंती होऊ शकतात.
मुंबईत डेंग्यूचे रुग्ण वेगाने वाढत आहेत.
डेंग्यू न्युरोलॉजिकल लक्षणे दाखवू शकतो.
मरिन ड्राईव्ह परिसरातील राहणाऱ्या ४६ वर्षीय व्यक्तीला १६ ऑगस्ट रोजी ताप आला होता. कुटुंबातील इतर भावंडांनाही फ्लूसारखी लक्षणं असल्यामुळे त्याने सुरुवातीला फ्लू असेल असं गृहित धरलं. पण अवघ्या ३६ तासांत त्यांची तब्येत अजूनच बिघडू लागली आणि तो बेशुद्ध पडला. कुटुंबीयांनी तातडीने त्याला ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केलं. मात्र पुढील २४ तास तो सतत त्रस्त राहिला आणि तब्बल ४८ तास तो पूर्णपणे शुद्धीवर आला नाही.
तपासणीत कळलं की, ही स्थिती डेंग्यू एन्सेफलायटिसमुळे झाली आहे. ही डेंग्यूची अतिशय दुर्मिळ पण गंभीर गुंतागुंत होती. ज्यामध्ये व्हायरस थेट नर्व्हस सिस्टिमवर हल्ला करतो. या व्यक्तीवर उपचार करणारे डॉ. प्रतीत सामदानी यांनी एका बेवसाईटला ही माहिती दिली.
यंदाच्या पावसाळ्यापासून मुंबईत डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया या तीन डासांमुळे होणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. २०२३ मध्ये महाराष्ट्रात तब्बल २० हजार डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली होती. २०२४ मध्ये डेंग्यूमुळे ५५ जणांचा मृत्यू झाला, तर चिकनगुनियामुळे ४० जण दगावले.
जुलै महिन्यात मुंबईत ७०८ डेंग्यू रुग्ण नोंदवले गेले तर १ ते १५ ऑगस्टदरम्यान आणखी ४०४ रुग्ण सापडले. यापैकी काही रुग्णांमध्ये मेंदूला सूज येणं यासारखी दुर्मिळ लक्षणं दिसली आहेत.
संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. वसंत नागवेकर यांनी सांगितलं की, डेंग्यू आणि चिकनगुनिया हे दोन्ही व्हायरस क्वचितच एन्सेफलायटिस (मेंदूची समस्या) निर्माण करू शकतात. गेल्या महिन्यात त्यांनी उपचार केलेल्या एका रुग्णाला आधी डेंग्यू झाला आणि नंतर काही आठवड्यांनी चिकनगुनियामुळे पुन्हा रुग्णालयात दाखल व्हावे लागले.
तज्ज्ञांनी सांगितलं की, डेंग्यू क्वचितच न्युरोलॉजिकल (मेंदूसंबंधी) लक्षण दाखवतो, पण कधी कधी तो वेगवेगळ्या स्वरूपात प्रकट होऊ शकतो. डॉ. समदानी यांनी सांगितलं की, डेंग्यूमुळे गंभीर फुफ्फुस संसर्ग, यकृत आणि किडनी निकामी होण्याच्या घटनाही दिसून आल्या आहेत.
“जेव्हा एखादा रुग्ण ताप आणि आकडीसह येतो तेव्हा तातडीने lumbar puncture करून (ज्यात पाठीच्या कण्यामधून द्रव घेऊन तपासणी केली जाते) निदान करणं आवश्यक असते,” असं डॉ. सामदानी म्हणालेत.
मरिन ड्राईव्हच्या रुग्णाच्या बाबतीतही सीएसएफ (Cerebrospinal Fluid) तपासणी आणि रक्त तपासणीत NS1 प्रोटीनचं प्रमाण जास्त आढळलं, जे डेंग्यू व्हायरस तयार करतो. डेंग्यूवर कोणताही विशिष्ट उपचार नसल्यामुळे या रुग्णाला लक्षणांनुसार उपचार देण्यात आले ज्यात अँटी-कोन्व्हल्संट औषधं आणि हायड्रेशन यांचा समावेश होता.
हा रुग्ण तब्बल सहा दिवस आयसीयूमध्ये होता. मात्र सुदैवाने, त्याच्या मेंदूवर कोणताही कायमस्वरूपी परिणाम दिसून आलेला नाही. डॉ. सामदानी यांनी सांगितलं की, डेंग्यूमध्ये केवळ प्लेटलेट काऊंटच नव्हे तर हिमोग्लोबिन पातळी देखील बारकाईने पाहणं गरजेचं आहे.
डेंग्यूमुळे मेंदूला सूज येणं का शक्य आहे?
होय, डेंग्यू व्हायरस नर्व्हस सिस्टिमवर हल्ला करून एन्सेफलायटिस होऊ शकतो.
मुंबईत जुलै २०२४ मध्ये किती डेंग्यू रुग्ण आढळले?
जुलै २०२४ मध्ये मुंबईत ७०८ डेंग्यू रुग्ण आढळले.
डेंग्यूच्या निदानासाठी कोणती तपासणी आवश्यक आहे?
सीएसएफ तपासणी आणि NS1 टेस्ट निदानासाठी आवश्यक आहे.
डेंग्यूमुळे शरीराचे कोणते अवयव प्रभावित होऊ शकतात?
फुफ्फुस, यकृत, किडनी आणि मेंदू प्रभावित होऊ शकतात.
डेंग्यूच्या उपचारात कोणत्या गोष्टींची पाहणी गरजेची आहे?
प्लेटलेट काऊंटबरोबर हिमोग्लोबिन पातळीची पाहणी गरजेची आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.