Male Menopause saam tv
लाईफस्टाईल

Male Menopause: पुरुषांनाही भेडसावते मेनोपॉजची समस्या; काय दिसून येतात याची लक्षणं?

Male Menopause: एका वयानंतर महिलांप्रमाणे पुरुषांच्या शरीरात देखील असे बदल होतात. पुरुषांमध्ये उद्भवणाऱ्या या स्थितीला एंड्रोपॉज (Andropause) किंवा मेल मेनोपॉज असं म्हटलं जातं.

Surabhi Jayashree Jagdish

एका ठराविक वयानंतर महिलांना मेनोपॉजची समस्या जाणवते. यामध्ये काही काळानंतर महिलांना मासिक पाळी येणं बंद होतं. मात्र तुम्हाला माहितीये का? एका वयानंतर महिलांप्रमाणे पुरुषांच्या शरीरात देखील असे बदल होतात. पुरुषांमध्ये उद्भवणाऱ्या या स्थितीला एंड्रोपॉज (Andropause) किंवा मेल मेनोपॉज असं म्हटलं जातं.

काय आहे मेल मेनोपॉज?

या स्थितीत पुरुषांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते. तज्ज्ञांच्या मते, वयानुसार केवळ महिलांच हार्मोनल बदलांना सामोरं जात नाहीत, तर पुरुषांनाही वयानुसार अशी काही लक्षणं जाणवतात.

मेनोपॉज आणि एंड्रोपॉजमध्ये काय आहे फरक?

रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज हा सामान्यतः स्त्रीच्या बायोलॉजिकल क्लॉकचा अंत असतो. तर पुरुषांमधील एंड्रोपॉज दरम्यान वेगळे बदल होतात. यावेळी पुरुष शुक्राणू तयार करू शकतात. शिवाय त्यांच्यात अजूनही प्रजनन क्षमता असते.

कारणं काय?

एंड्रोपॉज किंवा पुरुष रजोनिवृत्ती 45 ते 55 वर्षांच्या दरम्यान पुरुषांमध्ये अधिक सामान्यपणे दिसून येते. तर 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषाच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी सुमारे 50 टक्क्यांनी कमी होऊ शकते.

काय आहेत याची लक्षणं?

  • थकवा

  • नैराश्य

  • चिडचिड

  • लैंगिक इच्छा कमी होणे

  • इरेक्टाइल डिसफंक्शन

  • लठ्ठपणा

  • खूप घाम येणे

  • कोरडी त्वचा

उपाय काय?

  • संतुलित आहार घेतल्याने हार्मोनल असमतोलामुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्याही कमी होण्यास मदत होते.

  • नियमित व्यायाम करा. ज्यामध्ये ताकद प्रशिक्षण आणि हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी व्यायाम समाविष्ट आहे.

  • ध्यान आणि योगाच्या मदतीने तुमच्या दैनंदिन जीवनातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.

  • टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी फायदेशीर ठरू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अशोक खरातच्या मुलाची काल रात्री चौकशी

Mumbai Pune Tourist Spots: मुंबई-पुण्याजवळ वसलेल्या स्वर्गाहून सुंदर 'या' बेस्ट वीकेंड डेस्टिनेशनला द्या भेट

Oracle Layoff: कामावर येऊ नका; एका रात्रीत ३०,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं | VIDEO

Toll Price Hike: प्रवास महागला! महाराष्ट्रातील टोलच्या दरात मोठी वाढ, आता किती पैसे मोजावे लागतील ?

एकनाथ शिंदेंनी पहिला डाव टाकला, शिवसेनेत वेगवान हालचाली; श्रीकांत शिंदेंसह ३९ नेत्यांवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT