World Pneumonia Day: न्यूमोनिया संसर्गजन्य आहे? या संसर्गाबाबत काय आहे गैरसमजुती, तज्ज्ञांनी केल्या स्पष्ट

World Pneumonia Day: फुफ्फुसामध्ये हवेच्या अत्यंत छोट्या पिशव्या असतात. यांना 'अल्वेओली' असं म्हटलं जातं. यामध्ये जंतू संसर्ग झाल्यामुळे न्यूमोनिया होतो. यामुळे एखाद्या व्यक्तीला श्वास घेताना अत्यंत त्रास होऊ शकतो.
World Pneumonia Day
World Pneumonia Daysaam tv
Published On

'न्यूमोनिया' हा श्वसनमार्गाचा आजार आहे. विषाणू, जीवाणू किंवा बुरशी संसर्गामुळे फुफ्फुसांमध्ये संसर्ग होतो.बऱ्याचदा एक किरकोळ आजार किंवा सामान्य सर्दी म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते ज्यामुळे भविष्यात गंभीर गुंतागुंत होऊ शकते.

पुण्यातील अंकुरा हॉस्पिटलचे पेडियाट्रिक इंटेन्सिव्हिस्ट डॉ विश्रृत जोशी यांच्या सांगण्यानुसार, न्यूमोनियामध्ये फुफ्फुसातील पेशींना सूज येते. फुफ्फुसामध्ये हवेच्या अत्यंत छोट्या पिशव्या असतात. यांना 'अल्वेओली' असं म्हटलं जातं. यामध्ये जंतू संसर्ग झाल्यामुळे न्यूमोनिया होतो. यामुळे एखाद्या व्यक्तीला श्वास घेताना अत्यंत त्रास होऊ शकतो. न्यूमोनिया प्रामुख्याने विविध रोगजनकांमुळे होतो. यामध्ये जीवाणू, विषाणू किंवा बुरशी संसर्गाचा समावेश असतो.

World Pneumonia Day
Bypass surgery: हार्ट बायपास सर्जरी झालीये? दिवसागणिक काय आणि कशी काळजी घ्याल हे समजून घ्या तज्ज्ञांकडून...

न्यूमोनियाची लक्षणं काय असतात?

ताप, थंडी वाजणं, थकवा येणं, दम लागणं, छातीत दुखणं, खोकला, शिंका येणं, छातीत घरघर होणं यांसारख्या अनेक लक्षणं दिसून येतात. दुर्लक्ष केल्यास न्यूमोनिया हा जीवघेणा ठरू शकतो. ज्या लोकांना हा संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे त्यांनी सावध असले पाहिजे जसे की लहान मुले, ज्येष्ठ नागरिक ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे किंवा ज्यांना जुनाट आजार आहेत. याबाबत अनेक गैरसमजूती आढळून येतात ज्यामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि निदान व उपचारास विलंब होतो, असंही डॉ. जोशी यांनी सांगितलंय.

न्यूमोनिया संबंधित गैरसमजूती कोणत्या?

गैरसमज: न्यूमोनिया हा नेहमीच गंभीर असतो आणि त्याला रुग्णालयात राहण्याची आवश्यकता असते.

सत्यता: न्यूमोनिया सर्व प्रकरणे गंभीर नसतात किंवा रुग्णालयात दाखल करण्याची गरज असतेच असं नाही. न्यूमोनियाचे निदान झालेले बरेच लोक घरच्या घरी लवकर बरे होऊ शकतात. हाताच्या स्वच्छतेचे पालन करणं, आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँटीबायोटिक्ससह संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. लहान मुलं आणि वयोवृध्द रुग्णांना याकडे दुर्लक्ष केल्यास न्यूमोनिया जीवघेणा ठरू शकतो.

गैरसमज: न्यूमोनिया हा संसर्गजन्य आहे.

सत्यता: न्यूमोनियाचं इन्फेक्सन थेट संसर्गजन्य नसतात. न्यूमोनिया होण्यास कारणीभूत असलेले विषाणू अनेकांमध्ये सहज पसरू शकतात. हे विषाणू खोकला, शिंकणं तसंच आजारी लोकांच्या संपर्कातून पसरू शकतात. जंतूंच्या थेट संपर्कात आलेल्या प्रत्येकाला हा संसर्ग होण्याची शक्यता नाही.

गैरसमज: न्यूमोनिया हा केवळ बॅक्टेरियामुळे होतो

सत्यता: न्यूमोनिया हा जीवाणू, विषाणू आणि बुरशीसह विविध रोगजनकांमुळे होऊ शकतो. सर्वात सामान्य जीवाणू जे न्यूमोनियासाठी ओळखले जातात ते म्हणजे स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया. परंतु हे फ्लू, कोविड-19 किंवा रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस (RSV) सारख्या विषाणूंमुळे देखील होऊ शकते, ज्यामुळे व्हायरल न्यूमोनिया होतो.

World Pneumonia Day
सारखी सर्दी होतेय, नाक गळतोय, एक महत्वाचं कारण आलं समोर; उपाय काय कराल?

गैरसमज: न्यूमोनिया दुर्मिळ आहे, म्हणून लोकांना याबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही

सत्यता: न्यूमोनिया सारखे फुफ्फुसाचं संक्रमण भारतात सामान्य आहे, विशेषत: फ्लूच्या संसर्गात याचा अधिक धोका असतो. न्युमोनियाची प्रकरणे सर्रासपणे वाढत आहेत ज्यामुळे आरोग्याविषयक चिंता वाढली आहे. हे एखाद्या व्यक्तीच्या जीवनाच्या एकूण गुणवत्तेवर परिणाम करते आणि रुग्णाला रुग्णालयात दाखल व्हावे लागू शकते. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेले लोक, लहान मुले आणि वयोवृद्धांनी सावध राहणं गरजेचं आहे.

World Pneumonia Day
डाळ शिजवताना त्यावर येणारा फेस आरोग्यासाठी धोकादायक? पाहा तुमच्या प्रश्नाचं उत्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com