runny nose due to vitamin 12 deficiency
Runny nose in coldyandex

सारखी सर्दी होतेय, नाक गळतोय, एक महत्वाचं कारण आलं समोर; उपाय काय कराल?

Vitamin B12 deficiency: शरीरात बी १२ ची कमतरता असल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे याची कमतरता कशी पूर्ण कराल याची माहिती जाणून घ्या.
Published on

हिवाळ्यात थंड वातावरणामुळे आजारी पडणे हे सामान्य आहे. सर्दी होणे, खोकला होणे, ताप येणे सामान्यात: असे आजार होतच असतात. पण काही जणांना हिवाळा सोडून बाकीच्या वेळी सुद्धा थंडी लागणे, सर्दी होणे यासारखे आजार वारंवार होतात. हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी प्रोटीन, कार्बोहायड्रेटस , व्हिटामिन्स आणि मिनरल्स यासारख्या पोषक तत्वांची गरज असते. शरीरात प्रत्येक व्हिटामिन्स हे तितकेच महत्वाचे असतात. ते आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. शरीरात एका तरी व्हिटामिन्सची कमतरता असेल तर त्यामुळे वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात.

बहुतेक लोकांमध्ये व्हिटामिन डी आणि व्हिटामिन बी १२ ची कमतरता असते. कित्येक लोकांना या व्हिटामिन्सच्या कमतरतेची लक्षणे माहितच नसतात. व्हिटामिन बी १२ शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात. त्यामुळे वारंवार सर्दी होणे यामागचं मुख्य कारण म्हणजे शरीरात असणारी व्हिटामिन बी १२ (VITAMIN B12) कमतरता. व्हिटामिन बी १२च्या कमतरतेमुळे शरीरावर अनेक परिणाम होतात. मात्र, खूप लोकांना यामागचे मुख्य कारण माहित नसते. व्हिटामिन बी १२ हे शरीरात लाल रक्त पेशी निर्माण करतात तसेच रक्तातील ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करतात. तसेच याच्या कमतरतेमुळे रक्तातल्या लाल पेशी कमी होतात.

runny nose due to vitamin 12 deficiency
Thyroid Disease: थायरॉईड होण्याची कारणं काय? उपाय कोणता? जाणून घ्या सविस्तर

व्हिटामिन बी १२ कमतरतेचे लक्षण

शरीरात खूप काळापासून व्हिटामिन बी १२ ची कमतरता असेल, तर आपले शरीर वेळोवेळी याचे संकेत देत असत. मात्र, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो त्याचाच परिणामी अनेक वेळी विविध आजारांना बळी पडतो. व्हिटामिन बी १२ ची कमतरता असल्यास सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. अॅनिमिया, रक्ताची कमतरता, हात पाय सुन्न होणे, हाता पायाला मुंग्या येणे, थंडी लागणे असी लक्षणे जाणवतात. त्याच बरोबर मळमळणे, उलटी, अपचनचा त्रास होतो. शरीरात अधिक काळापर्यंत व्हिटामिन बी १२ ची कमतरता असल्यास गॅस्ट्रिक कॅन्सर, टाइप १ डायबिटीज, न्यूरोलॅाजिकल डिसऑडर सारख्या आणखी गंभीर आजारांना बळी पडू शकतो.

runny nose due to vitamin 12 deficiency
Cold & Cough : सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय तुमच्या किचनमध्येच आहे, डॉक्टरच्या औषधांशिवाय व्हाल बरे

आहारात या गोष्टींचा समावेश करा

व्हिटामिन बी १२ची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात व्हिटामिन बी १२ ने भरपूर असलेल्या वेगवेगळ्याचा पदार्थांचा समावेश केला पाहिजे. मुख्यत: मासांहारी पदार्थांमध्ये व्हिटामिन बी १२ भरपूर प्रमाणात असतात. रेड मीट, चिकन, मासे, अंडी यामध्ये व्हिटामिन बी १२ भरपूर प्रमाणात असल्याने यांचा रोजच्या आहारात सेवन केले पाहिजे. जर एखादी व्यक्ती शाकाहारी असेल तर त्यांनी दूध, पनीर , योगर्ट, नटस आणि चीज अशा गोष्टींचा समावेश केला पाहिजे. पौष्टिक आणि संतुलित आहाराने याची कमतरता दूर होण्यास मदत होईल.

Edited by: Priyanka Mundinkeri

runny nose due to vitamin 12 deficiency
Wedding Dates: यंदाच्या वर्षी उडवा बार! तुळशी विवाहानंतर कधी आहेत शुभ मुहूर्त, जाणून घ्या
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com