Memory Booster Tips SAAM TV
लाईफस्टाईल

Memory Booster Tips : तुम्हाला गोष्टी लक्षात राहत नाहीत का? स्मरणशक्ती वाढवण्यासाठी रामबाण उपाय

Shreya Maskar

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. काहींना गोष्टी लक्षात राहत नाही. त्याची स्मरणशक्ती कमकुवत होते. अशी लोक फार पटकन गोष्टी विसरून जातो. खरंतर वय वाढल्यावर ही समस्या अधिक वाढते. पण आता लहान वयातच अनेकांना ही समस्या त्रास देते. वेळेनुसार तुमची स्मरणशक्ती कमजोर होऊ लागते. स्मरणशक्ती कमी होण्यासाठी तुमची बदलती जीवनशैली कारणीभूत ठरते. कमकुवत स्मरणशक्तीवर मात करण्यासाठी आरोग्याची अशी काळजी घ्या.

नियमित व्यायाम करा

नियमित व्यायाम केल्याने तुमचा मेंदू तीक्ष्ण होईल. मेंदूला चालना मिळेल. व्यायामामध्ये तुम्ही योगासने, एरोबिक व्यायाम, सायकलिंग, नियमित चालणे इत्यादी गोष्टी करू शकता. यामुळे मेंदूच्या वृद्धत्वाची प्रक्रिया कमी होते. एरोबिक डान्स केल्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते. तसेच मूड देखील फ्रेश होतो. मनशांती मिळते. रोज १५ ते २० मिनिटे मेडिटेशन करा. ध्यान केल्याने मनासोबत मेंदूचे आरोग्यही उत्तम राहते.

श्वसनावर लक्ष केंद्रित करा

मेंदूचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी श्वास घेण्याचा व्यायाम तुम्हाला मदत करू शकतात. यामुळे तुमचे मन एकाग्र होते. असे नियमित केल्यास तुमचे एका ठराविक गोष्टींवर लक्ष केंद्रित होईल. तसेच तुमची स्मरणशक्ती वाढेल.

इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा कमी वापर

बदलत्या जीवनशैलीमुळे आपण मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करतो. यामुळे मेंदूचे आरोग्य बिघडते. तसेच मोबाईल, इंटरनेटमुळे आपली गोष्टी लक्षात ठेवण्याची सवय कमी झाली आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणे दूर करा आणि आपले छंद जोपासा. कामांमध्ये व्यस्त रहा. फिरण्याचा आनंद घ्या. यामुळे तुमचा मेंदू फ्रेश होईल.

मेंदूला चालना देणारे गेम्स खेळा

मेंदूचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सर्वात रामबाण उपाय म्हणजे मेंदूला चालना देणारे गेम्स खेळणे. यात बुद्धिबळ, क्रॉसवर्ड या खेळांचा समावेश आहे. हे खेळ खेळल्यामुळे आपली बुद्धी तीक्ष्ण होते.

पोषक आहार

मेंदूच्या उत्तम आरोग्यासाठी पोषक आहार घेणे गरजेचे आहे. यामुळे स्मरणशक्ती वाढते. रोजच्या आहारात तुम्ही हिरव्या भाज्या, बदाम, अक्रोड इत्यादींचा समावेश करू शकता. जे तुमचे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करतील. तुमच्या लक्षात गोष्टी राहत नसतील तर गोड खाण्याचे प्रमाण कमी करा. अतिगोड खाल्ल्याने मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. स्मरणशक्ती कमकुवत होते.

शरीराकडे लक्ष द्या

मेंदूच्या उत्तम आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे खूप महत्वाचे आहे. अपुरी झोप आपली स्मरणशक्ती कमकुवत करते. तुमचे वजन वाढलेले असल्यास त्याचा परिणाम मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो. यामुळे वजन नियंत्रणात ठेवा.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

SCROLL FOR NEXT