Meditation Benefits Saam TV
लाईफस्टाईल

Meditation Benefits: मेडिटेशनचे 'हे' गुणकारी फायदे तुम्हालाही माहिती नसतील; वाचून व्हाल थक्क

Meditation Benefits: मेडिटेशन केल्याने आरोग्याशी संबंधित विविध समस्या दूर होतात. मात्र अनेक व्यक्तींना मेडिटेशनचे नेमके फायदे माहित नाहीत. त्यामुळे आज त्याचीच माहिती जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

सध्या प्रत्येक व्यक्तीचे जीवन धकाधकीचे आणि धावपळीचे झाले आहे. लहान मुलांपासून अगदी मोठ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण विविध कामांमध्ये व्यस्त असतो. कामाचा हा ताण कमी व्हावा यासाठी प्रत्येक जण काही ना काही उपाय करत असतात. त्यातच मेडिटेशन करणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. मेडिटेशन केल्याने आरोग्याशी संबंधित विविध समस्या दूर होतात. मात्र अनेक व्यक्तींना मेडिटेशनचे नेमके फायदे माहित नाहीत. त्यामुळे आज त्याचीच माहिती जाणून घेणार आहोत.

मोठ्या आजारातून सुटका

काही व्यक्तींना आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या असतात. गंभीर आजार असला तरी आपल्या मनाच्या शक्तीने आपण त्यावर मात करू शकतो. त्यासाठी मन शांत आणि एकग्र करता आले पाहिजे. मनावर विजय मिळवल्यास तो व्यक्ती सर्वाधिक कठीण रोगावर सुद्धा विजय मिळवतो.

स्मरणशक्ती वाढते

लहान मुलांसह तरुण व्यक्तींना देखील आपल्या कामाच्या गोष्टी विसरण्याची सवय असते. ज्या व्यक्ती सतत हे विसरत असतील त्यांनी मेडिटेशन करण्यास सुरुवात केली पाहिजे. मेडिटेशन केल्याने आपण बराचवेळ आपलं लक्ष एकाच ठिकाणी केंद्रीत करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मोठी मदत होते.

आत्मविश्वास वाढतो

काही व्यक्ती फार हुषार असतात. मात्र सर्वासमोर काही प्रश्न विचारल्यास त्यांना पटकन याचे उत्तर देता येत नाही. ते अडखळतात किंवा चुकतात. तुमच्याबरोबर सुद्धा असे होत असेल तर मेडिटेशन करण्यास सुरुवात करा. मेडिटेशन केल्याने आपला आत्मविश्वास आहे त्याहून अधिक चांगला आणि स्ट्राँग होतो.

स्ट्रेस कमी होतो

काही व्यक्तींना कामाच्या ठिकाणी फार तणावपूर्ण वातावरणात काम करावे लागते. त्यामुळे त्यांच्या मनातील खदखद थेट त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. कामाचा जास्त ताण असेल तर सकाळी उठल्यावर १० ते १५ मिनिटे मेडिटेशन केले पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT